राजेश खांडवे यांनी शिरोली पोलीस ठाण्याचा पदभार स्वीकारला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2021 04:26 IST2021-08-27T04:26:43+5:302021-08-27T04:26:43+5:30
राजेश खांडवे यांनी गडचिरोली येथे नक्षली भागात सेवा बजावली आहे. त्यांनी गडचिरोली येथे ८ टीमच्या जवानांचे प्रतिनिधित्व करून अनेक ...

राजेश खांडवे यांनी शिरोली पोलीस ठाण्याचा पदभार स्वीकारला
राजेश खांडवे यांनी गडचिरोली येथे नक्षली भागात सेवा बजावली आहे. त्यांनी गडचिरोली येथे ८ टीमच्या जवानांचे प्रतिनिधित्व करून अनेक गुन्हेगारांच्या मुसक्या आवळत गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवले. या साहसी पराक्रमामुळे त्यांना २०१८ व २०२० या साली दोन शौर्य पदकाने सन्मानित केले आहे. ते मूळचे बीड जिल्ह्यातील माजलगावचे आहेत. बदली झालेले सहायक पोलीस निरीक्षक किरण भोसले यांची २०१९ मध्ये शिरोली पोलीस ठाण्यात नियुक्ती झाली होती. त्यांनी २०१९ व जुलै २०२१ ला आलेला महापूर व कोरोनाच्या काळातही उल्लेखनीय काम केले आहे. महत्वाच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवून गुन्हेगारी रोखण्याचा त्यांनी प्रयत्न केला होता.
यावेळी शिरोली पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी फुलांनी सजवलेल्या गाडीतून, पुष्पवृष्टी करुन भोसले यांना निरोप दिला तर खांडवे यांचे स्वागत केले.
फोटो : २६ शिरोली पोलीस स्वागत
सहायक पोलीस निरीक्षक किरण भोसले यांनी सहायक पोलीस निरीक्षक राजेश खांडवे यांचे स्वागत करुन शिरोली पोलीस ठाण्याचा पदभार दिला.