राजेंद्र सूर्यवंशी यांना ‘करवीर’ची उमेदवारी
By Admin | Updated: August 17, 2014 00:54 IST2014-08-17T00:54:14+5:302014-08-17T00:54:39+5:30
जनसुराज्य शक्ती- शेकाप आघाडी

राजेंद्र सूर्यवंशी यांना ‘करवीर’ची उमेदवारी
वारणानगर : करवीर विधानसभा मतदारसंघात जनसुराज्य शक्ती पक्ष व शेतकरी कामगार पक्ष यांच्यात युती झाली आहे. करवीर मतदारसंघातून या युतीचा उमेदवार म्हणून करवीर पंचायत समितीचे सदस्य राजेंद्र सूर्यवंशी यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. वारणानगर येथे आज, शनिवारी झालेल्या पत्रकार परिषदेत जनसुराज्यचे प्रवक्ते विजयसिंह जाधव व शेकापचे नेते अशोकराव पवार-पाटील यांनी रांजेंद्र सूर्यवंशी यांचे नाव जाहीर केले.
जनसुराज्यशक्ती पक्षाच्या वतीने आगामी विधानसभा निवडणुका लढविण्याचे जाहीर केले होते. या अगोदर आमदार कोरे यांनी शाहूवाडी मतदारसंघातून आपली उमेदवारी जाहीर केली. त्यापाठोपाठ हातकणंगलेतून माजी आमदार राजू आवळे यांची उमेदवारी जाहीर केली होती. आज, शुक्रवारी जनसुराज्यने जिल्ह्यातील करवीर मतदारसंघाची तिसरी जागा जाहीर केली. येत्या चार दिवसांत चंदगड मतदारसंघातील जनसुराज्याची भूमिका जाहीर करण्यात येणार असल्याचे जाधव यांनी सांगितले.
राजेंद्र सूर्यवंशी, माजी जिल्हा परिषद सदस्य बाबासाहेब देवकर, मार्केट कमिटीचे माजी उपाध्यक्ष शामराव सूर्यवंशी, शेकापचे करवीर तालुकाध्यक्ष के. पी. पाटील, आनंदराव मांढरे, बाबासाहेब वरुटे, सर्जेराव सूर्यवंशी, सरदार पाटील, जनसुराज्यचे विलास पाटील, भारत घाटगे उपस्थित होते. (वार्ताहर)