राजेंद्र पाटील-यड्रावकर शक्य

By Admin | Updated: December 16, 2014 00:40 IST2014-12-16T00:37:03+5:302014-12-16T00:40:23+5:30

राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्ष निवडीचे वारे : इच्छुकांच्या हालचाली गतिमान

Rajendra Patil-Yadravakar could be possible | राजेंद्र पाटील-यड्रावकर शक्य

राजेंद्र पाटील-यड्रावकर शक्य

राजाराम लोंढे - कोल्हापूर -राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जिल्हाध्यक्षपदी शरद सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र
पाटील-यड्रावकर यांची निवड शक्य मानली जात आहे. पक्षांतर्गत निवडणुकीतून जिल्हाध्यक्षपदाची निवड होणार असली, तरी प्रदेश पातळीवरून ज्या नावाची शिफारस होते, त्यावरच शिक्कामोर्तब केले जाते. संस्थात्मक पातळीवर सरस असणारा सध्या तरी यड्रावकर हा एकमेव तरुण चेहरा पक्षाकडे असल्याने त्यांच नाव आघाडीवर आहे.
विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर माजी आमदार के. पी. पाटील यांनी जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा श्रेष्ठींकडे पाठविला आहे. तो प्रदेशकडून मंजूर करण्यात आला नसला, तरी जिल्हाध्यक्ष म्हणून तरुण ताकदीचा चेहरा देण्याच्या दृष्टीने पक्षांतर्गत चाचपणी सुरू आहे. आगामी संस्थात्मक निवडणुकीत शिवसेना, भाजप व काँग्रेस यांच्या आक्रमणाला त्याच ताकदीने तोंड देणारा चेहरा देण्याचा प्रयत्न राष्ट्रवादीचा आहे. त्यासाठी के. पी. पाटील यांनाच पुन्हा संधी द्यावी, असा मतप्रवाह काहीजणांचा आह; पण के. पी. पाटील फारसे उत्सुक नाहीत, त्यातच तरुण व नवीन चेहरा देण्याचा पक्षाचा प्रयत्न आहे.
जिल्हाध्यक्षपदासाठी भैया माने, राजेंद्र पाटील, ए. वाय. पाटील व अरुण इंगवले यांच्या नावाची सध्या पक्षातंर्गत चर्चा सुरू आहे. जिल्हाध्यक्ष निवडताना संघटनात्मक पातळीवर काम करणारा, संस्थात्मक पाठबळ असलेला व कार्यकर्त्यांचे मोहळ असलेला चेहऱ्याला पसंती दिली जाते. भैया माने यांना संधी मिळू शकते; पण कागल तालुक्यात राष्ट्रवादी सक्षम असल्याने ते जबाबदारी घेतील, असे वाटत नाही. ए. वाय. पाटील यांना संधी दिली तर पुन्हा ‘मेहुण्या-पाहुण्या’च्या राजकारणाबद्दल वेगळा संदेश कार्यकर्त्यात जाईल, त्यामुळे त्यांचे नाव निवडणुकीपूर्वीच स्पर्धेतून बाजूला गेल्याचे समजते.
अरुण इंगवलेही इच्छुक असल्याचे समजते. त्यांच्या प्रदीर्घ अनुभवामुळे त्यांच्याही नावाचा विचार होऊ शकतो; पण संस्थात्मक पातळीवर त्यांच्यावर मर्यादा असल्याने राजेंद्र पाटील यांचे नाव पुढे येत आहे. हातकणंगले मतदारसंघात राष्ट्रवादी वाढीवर मर्यादा आल्या आहेत, यड्रावकर यांना संधी दिली, तर शिरोळ, हाकणंगले, शाहूवाडी व इचलकरंजी मतदारसंघातील कार्यकर्त्यांना बळ मिळेल. राष्ट्रवादी काँग्रेसच्या परवाच्या बैठकीत के. पी. पाटील यांनी यड्रावकर यांना तसे संकेतही दिले आहेत. आता पक्षाच्या निमंत्रणाची वाट पाहू नका, तुम्हालाच पुढे येऊन निमंत्रण द्यावे लागणार असल्याचे के. पी. पाटील यांनी स्पष्ट केल्याने यड्रावकरांच्या नावाला बळकटी मिळाली आहे.

आजपर्यंतचे जिल्हाध्यक्ष
दिवंगत बाबासाहेब कुपेकर
के. पी. पाटील
व्ही. बी. पाटील
लेमनराव निकम
मानसिंगराव गायकवाड (दोन महिन्यांसाठी)
के. पी. पाटील

$$्निराजेंद्र पाटील यांचेच नाव का ?
संस्थात्मक व कार्यकर्त्यांचा संच असणारा एकमेव तरुण चेहरा
शिरोळ, हातकणंगले तालुक्यात स्वतंत्र गट
हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील पक्षातंर्गत विरोधकांना शह
पंधरा वर्षांपासून जिल्हाध्यक्षपदापासून हातकणंगले वंचित

Web Title: Rajendra Patil-Yadravakar could be possible

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.