आमजाई व्हरवडे शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी राजेंद्र पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 04:17 IST2021-06-17T04:17:48+5:302021-06-17T04:17:48+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क आमजाई व्हरवडे : आमजाई व्हरवडे (ता. राधानगरी) येथील प्राथमिक शाळेच्या शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी राजेंद्र गोविंद ...

आमजाई व्हरवडे शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी राजेंद्र पाटील
लोकमत न्यूज नेटवर्क
आमजाई व्हरवडे : आमजाई व्हरवडे (ता. राधानगरी) येथील प्राथमिक शाळेच्या शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी राजेंद्र गोविंद पाटील यांची तर उपाध्यक्षपदी दीपाली शिवाजी कांबळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक दत्तात्रय मालप होते.
राधानगरी तालुक्यात सर्वाधिक विद्यार्थी संख्या व शिक्षणात अग्रेसर असणाऱ्या या शाळेच्या कमिटीची निवड ही प्रतिष्ठेची मानली जाते. येथील विद्यार्थ्यांनी राज्य पातळीवर या शाळेचे नाव उज्ज्वल केले आहे.
तत्कालीन अध्यक्ष संगीता पाटील व उपाध्यक्ष दिनकर ढेरे यांनी ठरल्याप्रमाणे राजीनामे दिल्याने या निवडी करण्यात आल्या. अध्यक्षपदासाठी राजेंद्र पाटील यांचे नाव सुनील चौगले यांनी सुचवले तर माजी उपसरपंच संदीप पाटील यांनी अनुमोदन दिले. तर उपाध्यपदासाठी कांबळे यांचे नाव सत्ताप्पा पाटील यांनी नाव सुचवले त्यास दिनकर ढेरे यांनी अनुमोदन दिले. नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार मुख्याध्यापक दत्तात्रय मालप, वाय. बी. चव्हाण, सरपंच आनंदराव कांबळे यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी सत्ताप्पा पाटील, पत्रकार सुनील चौगले, संदीप पाटील, दिनकर ढेरे, आर. बी. चौगले, वाय. बी. चव्हाण, सुरेश कुसाळे, सुरेश पाटील, सोनम पाटील, एम. जी. मोगणे, जाधव उपस्थित होते.