शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur Crime: कोट्यवधींच्या फसवणुकीचा सूत्रधार राजेंद्र नेर्लेकर अटकेत, दीड वर्षापासून होता पसार

By उद्धव गोडसे | Updated: October 13, 2025 16:45 IST

हुपरीतील एका जैन मुनींचीही त्याने फसवणूक केल्याचे उघडकीस येताच खळबळ उडाली होती. याबाबत मुनींसह गुंतवणूकदारांनी नेर्लेकर याच्या घरासमोर उपोषण केले होते

कोल्हापूर : गुंत‌वणुकीवर जादा परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवून कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचे गुन्हे दाखल असलेला राजेंद्र भीमराव नेर्लेकर (वय ४८, रा. शिवाजीनगर, हुपरी) याला आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने सोमवारी (दि. १३) अटक केली. जानेवारी २०२४ पासून तो पसार होता. इचलकरंजी येथील न्यायालयात हजर केल असता त्याला पोलिस कोठडी मिळाली.विविध प्रकारचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घातल्याप्रकरणी नेर्लेकर याच्यावर हुपरी आणि शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. याशिवाय आंध्रप्रदेशातही त्याच्यावर फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत. आंध्रप्रदेश पोलिसांनी त्याला अटकही केली होती. डिसेंबर २०२३ मध्ये त्याच्यावर हुपरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.हुपरीतील एका जैन मुनींचीही त्याने फसवणूक केल्याचे उघडकीस येताच खळबळ उडाली होती. याबाबत मुनींसह गुंतवणूकदारांनी नेर्लेकर याच्या घरासमोर उपोषण केले होते. त्यानंतर अटकेच्या भीतीने नेर्लेकर पसार झाला होता. जानेवारी २०२४ मध्ये त्याच्या पत्नीने तो बेपत्ता असल्याची फिर्याद हुपरी पोलिस ठाण्यात दिली होती. अखेर २० महिन्यांनी त्याला अटक करण्यात आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाला यश आले.फस‌वणुकीची व्याप्ती वाढलीनेर्लेकर याने अनेकांना गंडा घातल्याचे समोर येत आहे. हुपरी पोलिस ठाणे आणि आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेकडे आलेल्या तक्रार अर्जांनुसार १९ कोटींची फसवणूक झाल्याचे स्पष्ट झाले. हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता पोलिसांकडून वर्तवली जात आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Kolhapur Crime: Fraudster Rajendra Nerlekar Arrested After Year and Half

Web Summary : Rajendra Nerlekar, accused of multi-crore fraud, was arrested after being on the run for 20 months. He allegedly lured investors with high returns, defrauding them of crores. Police investigations revealed fraud exceeding ₹19 crore, with potential for further increase.