राजेंद्र जाधव ‘भीम श्री’चा मानकरी
By Admin | Updated: April 9, 2016 00:41 IST2016-04-09T00:18:59+5:302016-04-09T00:41:06+5:30
स्पर्धेत विजय सूर्यवंशी याने बेस्ट पोझर, नितीन पाटील याने बेस्ट डेव्हलपर, तर अमन कांबळे याने बेस्ट मस्क्युलर पदक

राजेंद्र जाधव ‘भीम श्री’चा मानकरी
गडहिंग्लज : डॉ. आंबेडकरांच्या १२५व्या जयंतीनिमित्त येथील भीमराज व्यायामशाळा, जयभीम युवा संघर्ष व जयंती उत्सव कमिटी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शरीरसौष्ठव स्पर्धेत करंबळीचा राजेंद्र जाधव ‘भीम श्री’ किताबाचा मानकरी ठरला.
स्पर्धेत विजय सूर्यवंशी याने बेस्ट पोझर, नितीन पाटील याने बेस्ट डेव्हलपर, तर अमन कांबळे याने बेस्ट मस्क्युलर पदक पटकाविले. पोलिस उपनिरीक्षक सचिन मदव्वान्ना यांच्या हस्ते बक्षीस वितरण झाले. यावेळी अरुणा कोलते, आप्पा शिवणे आणि समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.स्पर्धेचा निकाल अनुक्रमे असा : ५५ किलो : प्रकाश भुर्इंगडे, शिवप्रसाद केसरकर, विठ्ठल माळी, राजेश कांबळे, प्रशांत इंगळे. ६० किलो : अमन कांबळे, अमोल ऱ्हाटवळ, शिवराज पाटील, भूषण कोले, मारुती धामणकर, ६५ किलो - राजेंद्र जाधव, अनिकेत पारळे, रोहित शेवाळे, श्रेयस ढेरे, अक्षय गडकरी.
७० किलो : नितीन पाटील, विनोद हेळवाळकर, विजय नांदवडेकर, असलम बावडेकर, इकबाल मुल्ला. खुला गट : प्रमोद इंगळे, विजय सूर्यवंशी, नियाज पटेल, सैफ शेख, गौतम कांबळे यांनी यश मिळविले.परीक्षक म्हणून प्रा. के. बी. केसरकर, संजय धुरे व जाकीर नदाफ यांनी काम पाहिले. स्पर्धेसाठी काशिनाथ कांबळे, अमर म्हेत्री, सूरज कांबळे, संतोष कांबळे, दिगंबर विटेकरी यांनी विशेष परिश्रम घेतले.