म्हाकवेतील तरुणाच्या कुटुंबीयांना राजे फाउंडेशनची मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2021 04:24 IST2021-09-03T04:24:38+5:302021-09-03T04:24:38+5:30
शाहू साखरचे संचालक पी. डी. चौगुले, उपसरपंच धनंजय पाटील, नितीन पाटील, ए. डी. पाटील, दीपक कांबळे यांच्या हस्ते ही ...

म्हाकवेतील तरुणाच्या कुटुंबीयांना राजे फाउंडेशनची मदत
शाहू साखरचे संचालक पी. डी. चौगुले, उपसरपंच धनंजय पाटील, नितीन पाटील, ए. डी. पाटील, दीपक कांबळे यांच्या हस्ते ही ठेव पावती देण्यात आली.
उपसरपंच धनंजय पाटील म्हणाले, समरजित घाटगे यांनी कुटुंबाला तत्काळ मदत करत सामाजिक कार्याची ओळख करून दिली आहे.
या वेळी सरपंच सुनीता चौगुले, सिद्राम गंगाधरे, विलास पाटील, संदीप पाटील, अजित माळी, अजित पाटील, चंद्रकांत कांबळे आदी उपस्थित होते.
कॅप्शन
म्हाकवे येथील ओढ्यावरून पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या सचिन जयराम पाटील या तरुणाच्या कुटुंबीयांना ठेव पावती देण्यात आली. या वेळी शाहूचे संचालक पी. डी. चौगुले, उपसरपंच धनंजय पाटील, नितीन पाटील, ए. डी. पाटील, दीपक कांबळे आदी उपस्थित होते.