राजर्षींचा दुर्मीळ दस्तऐवज पुस्तकरूपात
By Admin | Updated: June 30, 2016 01:07 IST2016-06-30T00:41:41+5:302016-06-30T01:07:26+5:30
पुराभिलेखागार कार्यालयाचा उपक्रम : छायाचित्र प्रदर्शनाचा आज शेवटचा दिवस

राजर्षींचा दुर्मीळ दस्तऐवज पुस्तकरूपात
कोल्हापूर : राजर्षी शाहू महाराजांच्या बालपणापासून ते त्यांनी समाजोद्धारासाठी केलेल्या कार्याची साक्ष देणारी दुर्मीळ कागदपत्रे, छायाचित्रे, आदेश, जाहीरनामे हा सगळा दस्तऐवज आता पुराभिलेखागार कार्यालयाच्या वतीने पुस्तकरूपाने जतन केला जाणार आहे. दरम्यान, शाहू स्मारक भवनमध्ये सुरू असलेल्या या दस्तऐवज व छायाचित्र प्रदर्शनाचा आज, गुरुवारी शेवटचा दिवस आहे.
राजर्षी शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत असलेल्या पुराभिलेख संचालनालय व कोल्हापूर पुराभिलेखागार कार्यालय यांच्यातर्फे शाहू स्मारक भवन कलादालन येथे शाहूकालीन दस्तऐवज व छायाचित्रांच्या प्रदर्शनाचे आयोजन केले आहे.
यात शाहू महाराजांचे दत्तकविधान, महाराजांचे राज्यारोहण, शाहूकालीन पत्रव्यवहार, त्यांनी अस्पृश्योद्धारासाठी व दुष्काळी परिस्थितीत केलेले कार्य, त्यांचे शैक्षणिक, सांस्कृतिक, सामाजिक, वैद्यकीय, कला-क्रीडा, प्रशासकीय, इत्यादी क्षेत्रांतील कार्य, पर्यावरण रक्षणासाठी केलेले कार्य, तसेच राज्यकारभार करताना त्यांनी वेळोवेळी दिलेले निर्णय, या विषयांसंदर्भातील महत्त्वाची निवडक कागदपत्रे शाहूकालीन, दुर्मीळ छायाचित्रांसह प्रदर्शित करण्यात आली आहेत.
या प्रदर्शनातील दस्तऐवज, महाराजांचे आदेश, दुर्मीळ छायाचित्रे यांचे संकलन करून शासनामार्फत पुस्तकरूपात ते प्रसिद्ध करण्याचा मानस कोल्हापूर पुराभिलेखागारचे सहायक संचालक केशव जाधव यांनी व्यक्त केला. यावेळी पुराभिलेखागारकार्यालयाचे गणेश खोडके उपस्थित होते. गेल्या चार दिवसांत नागरिकांनी या प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. अशा प्रदर्शनाचे आयोजन वारंवार केले जावे. छत्रपतींचा जीवनप्रवास आम्हाला समजला, अशी प्रतिक्रिया नागरिकांनी नोंदविली.
संग्रहालयासाठीही प्रयत्न
शाहू महाराजांचा स्पर्श झालेला हा दुर्मीळ दस्तऐवज नागरिकांना पाहण्यासाठी कायम खुला राहावा, यासाठी संग्रहालय उभारणे गरजेचे आहे. या दस्तऐवजांचे जतन व कायमस्वरूपी योग्य संवर्धन करून ते खुले करता येणे शक्य आहे.
शाहू जन्मस्थळ व शाहू स्मारक या दोन्ही ठिकाणीही या दस्तऐवजांचे संग्रहालय उभारता येणे शक्य आहे. त्यासाठीचा प्रस्तावही शासनाला पाठविण्यात येणार आहे.
संग्रहालयासाठीही प्रयत्न
शाहू महाराजांचा स्पर्श झालेला हा दुर्मीळ दस्तऐवज नागरिकांना पाहण्यासाठी कायम खुला राहावा, यासाठी संग्रहालय उभारणे गरजेचे आहे. या दस्तऐवजांचे जतन व कायमस्वरूपी योग्य संवर्धन करून ते खुले करता येणे शक्य आहे.
शाहू जन्मस्थळ व शाहू स्मारक या दोन्ही ठिकाणीही या दस्तऐवजांचे संग्रहालय उभारता येणे शक्य आहे. त्यासाठीचा प्रस्तावही शासनाला पाठविण्यात येणार आहे.
प्रत्येक व्यक्तीला ठरावीक कालावधीतील प्रदर्शन पाहायला मिळेलच असे नाही. शाहू महाराजांनी केलेल्या अलौकिक कार्याची माहिती देणारा हा दुर्मीळ ठेवा संग्राह्य रूपात कायमस्वरूपी नागरिकांजवळ राहील, या उद्देशाने पुस्तकाचे प्र्रकाशन करण्याचा मानस आहे.
- केशव जाधव, सहायक संचालक, पुराभिलेखागार