जयसिंगपूर: जयसिंगपूर येथील नगरपालिकेच्या निवडणुकीत राजर्षी शाहू विकास आघाडी ने २६ पैकी २० जागा जिंकून एकतर्फी सत्ता काबीज केली. तर विरोधी शिरोळ तालुका विकास -जन संघर्षआघाडीला पाच तर एक अपक्ष उमेदवारानेही खाते उघडले आहे. ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर मंदिरानजीक यात्री निवास मधील पालिकेच्या कार्यालयात आज, रविवारी निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हा पुरवठा अधिकारी मोहिनी चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली मतमोजणी झाली. आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी पुन्हा एकदा शहरावर आपले वर्चस्व सिद्ध केले आहे.
यड्रावकर यांचे बंधू संजय पाटील- यड्रावकर यांना नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत २२६४७ मते मिळाली. प्रतिस्पर्धी उमेदवार सुदर्शन कदम यांना ११४६० मते मिळाली. निकालानंतर राजर्षी शाहू विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करत एकच जल्लोष केला.
Web Summary : Rajendra Patil Yadravkar's Rajarshi Shahu Vikas Aghadi secured a landslide victory in Jaysingpur municipality elections, winning 20 out of 26 seats. Sanjay Patil-Yadravkar won the mayoral election. Celebrations erupted as Yadravkar reaffirmed his dominance.
Web Summary : राजेंद्र पाटिल यड्रावकर की राजर्षि शाहू विकास अघाड़ी ने जयसिंगपुर नगरपालिका चुनावों में भारी जीत हासिल की, 26 में से 20 सीटें जीतीं। संजय पाटिल-यड्रावकर ने महापौर चुनाव जीता। यड्रावकर ने अपना दबदबा फिर से स्थापित किया।