शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
3
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
4
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
5
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
6
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
7
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
8
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
9
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
10
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
11
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
12
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
13
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
14
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
15
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
16
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
17
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
18
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
19
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
20
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार

राजर्षी शाहू स्मृती जागर: शिक्षण, कायद्याद्वारे स्त्रियांच्या उद्धाराचे कार्य करणारा राजा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2022 14:17 IST

स्त्रियांना पुरुषप्रधानतेच्या जोखडातून बाहेर काढण्यासाठी शाहू महाराजांनी क्रांती घडवणारे पाच कायदे केले. विधवा पुनर्विवाह कायदा १९१७, आंतरजातीय, आंतरधर्मिय विवाह कायदा घरगुती छळ प्रतिबंधक कायदा१९१९, काडीमोड कायदा असे कायदे केले.

डॉ. मंजूश्री पवारआधुनिक महाराष्ट्राच्या जडणघडणीचे अध्वर्यू असलेल्या शाहू-फुले आणि आंबेडकर यांच्यामध्ये शाहू महाराजांचे वेगळेपण दिसून येते. कारण राजा असूनही त्यांनी समाजक्रांतीसाठी राजदंडाचा वापर केला. आपले छत्रपतीपद आणि अधिकारांचा वापर सामाजिक, आर्थिक उन्नतीसाठी करणारा हा लोकराजा होता. राजर्षी शाहू महाराजांनी महिला, बहुजन, मागासवर्गिय, दलित, भटके विमुक्त, शोषितांसाठी केलेल्या कार्यापैकी स्त्रियांच्या उद्धारासाठीचे काम हे मानवमुक्तीच्या कार्यात मोडते.बहुजन रयतेतील अर्धा भाग असलेल्या स्त्रियांना पुरुषी वर्चस्वाच्या अवस्थेतून बाहेर काढायचे असेल तर त्यांना शिक्षण दिले पाहिजे हे हेरून त्यांनी स्त्री शिक्षणाला सुधारणावादी कारभाराचा भाग बनवला. प्राथमिक शिक्षणात स्त्री शिक्षणाचा समावेश केलाच; पण डोंगरी, ग्रामीण, मागासलेल्या भागात, चांभार, ढोर, अशा वंचित जाती-जमातींमधील मुलींसाठी वेगळ्या शाळा काढल्या. शिक्षकांनी मुलींच्या शिक्षणात रस घ्यावा म्हणून मुलींची संख्या व त्यांच्या प्रगतीवर शिक्षकांना बक्षिसे ठेवली.त्यांनी १९१९ मध्ये एक हुकूम काढला ज्यात ज्या मागासवर्गीय महिला शिक्षण घेऊ इच्छितात त्यांच्यासाठी दरबारकडून मोफत राहण्या व जेवणाची सोय करण्यात आली. अक्कासाहेब महाराज यांच्या विवाहानिमित्त महाराष्ट्र व गुजरातमध्ये मुलींच्या शिक्षणासाठी शिष्यवृत्ती सुरू केली. कोल्हापूरमध्ये फिमेल ट्रेनिंग स्कूलमधील मिस लिटल या शिक्षिका निवृत्त झाल्यानंतर रखमाबाई केळवकर या बुद्धिमान स्त्रीची शिक्षिका म्हणून नेमणूक केली. अल्बर्ट मेमोरियलमध्ये स्त्री विभाग सुरू केला जिथे रखमाबाई यांच्या कन्या कृष्णाबाई केळवकर यांची वैद्यकीय अधिकारी म्हणून नियुक्ती केली.एवढ्यावरच न थांबता त्यांनी कृष्णाबाईंना उच्च शिक्षणासाठी मुंबईच्या ग्रॅन्ड मेडिकल कॉलेजमध्ये पाठवले. तिथून पुढे इंग्लंडला पाठवले. स्त्रियांचा राजकीय क्षेत्रातदेखील वावर हवा या उद्देशाने १८९५ साली झालेल्या राष्ट्रीय काँग्रेस अधिवेशनात केळवकरांना स्त्री प्रतिनिधी म्हणून पाठवले. आपल्या भाेवती राजकीय-सामाजिक चळवळीतील अनेक जाणकार असताना त्यांनी जाणीवपूर्वक दोन महिलांची निवड केली.स्त्री उद्धार आणि राजर्षी शाहू महाराज हा विषय मांडताना त्यांच्या स्नुषा इंदुमती सरकार यांचा उल्लेख झालाच पाहिजे. मुलगा प्रिन्स शिवाजी यांच्या निधनानंतर इंदुमती या आपल्या ११ वर्षाच्या स्नुषेला त्यांनी राज कुटुंबाचा रोष पत्करून शिक्षणासाठी सोनतळीला ठेवले. त्यांच्यामध्ये सामाजिक भान यावे म्हणून त्यांच्यासोबत चार वेगवेगळ्या जाती-धर्मातील मुली शिक्षणासाठी ठेवल्या.इंदुमती सरकार या डॉक्टर व्हाव्यात अशी महाराजांची इच्छा होती, त्यासाठी त्यांचे लेडी हार्डिंग जनाना मेडिकल कॉलजमध्ये ॲडमिशनदेखील केली, पण दरम्यान शाहू महाराजांचे निधन झाल्याने त्यांचा हा संकल्प पूर्ण होऊ शकला नाही.  शिक्षण आणि कायद्याद्वारे प्रस्थापित समाजरचना आणि स्त्रीमुक्तीचे शस्त्र शाहू महाराजांनी स्त्रियांच्याच हाती दिले. शाहूंचे वारसदार म्हणून आज समाजाने स्त्रीकडे बघताना शाहू महाराजांप्रमाणे दृष्टिकोन ठेवला पाहिजे.

स्त्रियांचे जीवन बदलणारे पाच कायदे

स्त्रियांना पुरुषप्रधानतेच्या जोखडातून बाहेर काढण्यासाठी शाहू महाराजांनी क्रांती घडवणारे पाच कायदे केले. विधवा पुनर्विवाह कायदा १९१७, आंतरजातीय, आंतरधर्मिय विवाह कायदा घरगुती छळ प्रतिबंधक कायदा१९१९, काडीमोड कायदा असे कायदे केले. एवढेच नव्हे तर अनौरस संतती व जोगतीण सर्वात उपेक्षित स्त्री वर्गाच्या उद्धारासाठीही त्यांनी काम केले.

लेखिका इतिहासाच्या अभ्यासक व संशोधक आहेत

टॅग्स :kolhapurकोल्हापूरShahu Maharaj Chhatrapatiशाहू महाराज छत्रपतीWomenमहिला