‘सीसीएमपी’ परीक्षेत राजर्षी शाहू वैद्यकीय महाविद्यालयाचे यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2020 01:05 PM2020-02-26T13:05:47+5:302020-02-26T13:14:05+5:30

कोल्हापूर येथील राजर्षी शाहू वैद्यकीय महाविद्यालयाने महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्यावतीने घेण्यात आलेल्या सर्टीफिकेट कोर्स इन मॉडर्न फ्राम्याकॉलॉजी (सीसीएमपी) परीक्षेत यश मिळविले आहे. डिसेंबर २०१९ मध्ये झालेल्या या परीक्षेचा महाविद्यालयाचा निकाल शंभर टक्के लागला आहे. पहिल्या दहा गुणवंतांच्या यादीत सहा विद्यार्थी डॉक्टर चमकले आहेत. डॉ. हर्षवर्धन अंतुरकर यांनी राज्यात प्रथम क्रमांक पटकविला आहे.

Rajarshi Shahu Medical College Achievement in CCMP Exam | ‘सीसीएमपी’ परीक्षेत राजर्षी शाहू वैद्यकीय महाविद्यालयाचे यश

‘सीसीएमपी’ परीक्षेत राजर्षी शाहू वैद्यकीय महाविद्यालयाचे यश

googlenewsNext
ठळक मुद्दे‘सीसीएमपी’ परीक्षेत राजर्षी शाहू वैद्यकीय महाविद्यालयाचे यशहर्षवर्धन अंतुरकर राज्यात प्रथम; सहा विद्यार्थी गुणवत्ता यादीत चमकले

कोल्हापूर : येथील राजर्षी शाहू वैद्यकीय महाविद्यालयाने महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्यावतीने घेण्यात आलेल्या सर्टीफिकेट कोर्स इन मॉडर्न फ्राम्याकॉलॉजी (सीसीएमपी) परीक्षेत यश मिळविले आहे. डिसेंबर २०१९ मध्ये झालेल्या या परीक्षेचा महाविद्यालयाचा निकाल शंभर टक्के लागला आहे. पहिल्या दहा गुणवंतांच्या यादीत सहा विद्यार्थी डॉक्टर चमकले आहेत. डॉ. हर्षवर्धन अंतुरकर यांनी राज्यात प्रथम क्रमांक पटकविला आहे.

गुणवत्ता यादीत चमकलेल्या विद्यार्थ्यांमध्ये डॉ. चेतन जोशी, अभय जाधव, अमोल पाटील, बद्रुद्दीन मणेर, रवींद्र मगदूम यांचा समावेश आहे. या विद्यार्थ्यांचा सत्कार वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. मिनाक्षा गजभिये यांच्या हस्ते करण्यात आला. रुग्णांचा उपचार करण्यासाठी अचूक निदान, कमीत कमी प्रतिजैविकांचा योग्य वापर करा, असे आवाहन त्यांनी केले.

ज्ञान, अनुभवाचा रुग्णसेवेसाठी वापर करून कमीत कमी पैशांमध्ये दर्जेदार वैद्यकीय सेवा देण्यास बांधील असल्याचे डॉ. मणेर यांनी सांगितले. यावेळी प्राध्यापक, विद्यार्थी, कर्मचारी उपस्थित होते. यशस्वी विद्यार्थ्यांना उपअधिष्ठाता डॉ. सुदेश गंधम, सुनिता रामानंद, महेंद्रकुमार बनसोडे, वसंतराव देशमुख, शिरीष शानभाग, सुधीर सरोदे, सीसीएमपी कोर्सचे समन्वयक डॉ. रामा भोसले, महाराष्ट्र कौन्सिल आॅफ होमिओपॅथीचे अध्यक्ष डॉ. राजकुमार पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.
 

 

Web Title: Rajarshi Shahu Medical College Achievement in CCMP Exam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.