मिनाज जमादार यांना राजर्षी शाहू पुरस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:03 IST2021-02-05T07:03:17+5:302021-02-05T07:03:17+5:30
शिरोळ : येथील पंचायत समितीच्या माजी सभापती मिनाज जमादार यांना ‘राजर्षी शाहू छत्रपती पुरस्कार’ने गौरविण्यात आले. कोल्हापूर येथे जिल्हा ...

मिनाज जमादार यांना राजर्षी शाहू पुरस्कार
शिरोळ : येथील पंचायत समितीच्या माजी सभापती मिनाज जमादार यांना ‘राजर्षी शाहू छत्रपती पुरस्कार’ने गौरविण्यात आले. कोल्हापूर येथे जिल्हा परिषदेकडून त्यांना हा पुरस्कार देण्यात आला.
शिरोळ पंचायत समितीच्या इतिहासात पहिल्यांदाच हा पुरस्कार मिळाला आहे. पुरस्कार प्राप्त झाल्याने शिरोळ पंचायत समितीची मान जिल्ह्यात उंचावली आहे. आॅगस्ट २०१९मध्ये आलेल्या महापुरात केलेले मदतकार्य आणि कोरोनाच्या संकट काळात केलेले कार्य या सर्वांचा विचार करून जमादार यांना हा पुरस्कार देण्यात आला.
कोल्हापूर येथे झालेल्या या कार्यक्रमाला खासदार शरद पवार, मंत्री हसन मुश्रीफ, जयंत पाटील, सतेज पाटील, पृथ्वीराज चव्हाण, राजेंद्र पाटील-यड्रावकर, बजरंग पाटील, सतीश पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
फोटो - २८०१२०२१-जेएवाय-०५
फोटो ओळ - कोल्हापूर येथे मिनाज जमादार यांना ‘राजर्षी शाहू पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले. यावेळी शरद पवार, सतेज पाटील, जयंत पाटील, राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.