राजारामपुरी पोलिसांकडून मारहाणप्रकरणी चौकशीचे आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 04:25 IST2021-05-19T04:25:30+5:302021-05-19T04:25:30+5:30
कोल्हापूर : राजारामपुरी पोलिसांनी राकेश उदय रेंदाळकर (रा. शिवाजी उद्यमनगर, कोल्हापूर) या तरुणाला पोलीस ठाण्यात आणून अमानुषपणे मारहाण केल्याच्या ...

राजारामपुरी पोलिसांकडून मारहाणप्रकरणी चौकशीचे आदेश
कोल्हापूर : राजारामपुरी पोलिसांनी राकेश उदय रेंदाळकर (रा. शिवाजी उद्यमनगर, कोल्हापूर) या तरुणाला पोलीस ठाण्यात आणून अमानुषपणे मारहाण केल्याच्या लेखी तक्रारीची गंभीर दखल घेतली आहे. त्या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश पोलीस उपअधीक्षक आर. आर. पाटील यांना दिले आहेत, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी मंगळवारी दिली.
राकेश रेंदाळकर याने, आपल्याला दि. १३ मे २०२१ रोजी राजारामपुरी पोलिसांनी पोलीस ठाण्यात नेऊन निरीक्षकांच्या केबिनमध्ये अमानुषपणे मारहाण केल्याची लेखी तक्रार पोलीस अधीक्षक बलकवडे यांच्याकडे केली होती. या प्रकरणाची गंभीर दखल पोलीस अधीक्षकांनी घेऊन चौकशी करण्याचे आदेश उपअधीक्षक आर. आर. पाटील यांना दिले आहेत. आठवड्यात त्या प्रकरणाचा सविस्तर चौकशी अहवाल सादर करण्याचे आदेश पाटील यांना देण्यात आले आहेत.