राजाराम वरुटेंवर कारवाई करणार

By Admin | Updated: November 20, 2014 00:19 IST2014-11-20T00:14:21+5:302014-11-20T00:19:53+5:30

एस. व्ही. पाटील : शिक्षक संघाच्या नावाचा गैरवापर

Rajaram Verma will take action against | राजाराम वरुटेंवर कारवाई करणार

राजाराम वरुटेंवर कारवाई करणार

कोल्हापूर : प्राथमिक शिक्षक संघाच्या राज्याध्यक्षपदाचा राजीनामा दिला असताना राजाराम वरुटे संघाच्या नावाचा गैरवापर करत आहेत. आगामी महामंडळाच्या बैठकीत वरुटे यांच्यावर फौजदारी दाखल करण्याचा ठराव करणार असल्याची माहिती शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष एस. व्ही. पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. रविवारी (दि. २३) शिक्षक संघाचे राज्यस्तरीय शिक्षक महामंडळ सभेचे आयोजन केल्याचेही त्यांनी सांगितले.
पाटील म्हणाले, राज्य शासनाने नुकतीच अधिकृत शिक्षक संघटना कोणत्या हे सांगितले आहे. संभाजीराव थोरात यांच्या नेतृत्वाखालील प्राथमिक शिक्षक संघ हा अधिकृत संघ आहे. शिवाजीराव पाटील यांच्याबाबत न्यायप्रविष्ठ बाब आहे; पण राजाराम वरुटे हे संभाजीराव थोरात यांच्या नेतृत्वाखाली काम करत होते. त्यांनी स्वत:हून राजाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी शिक्षकांच्या जाहीर सभेत नवीन संघटनेची नोंदणी केल्याची घोषणा केली असताना ते पुन्हा शिक्षक संघाचे राज्याध्यक्ष म्हणून दिशाभूल करत आहेत. त्याला राज्यातील शिक्षक भूलणार नसून संभाजीराव थोरात यांच्यामागे राज्यातील ३३ जिल्हाध्यक्ष, महापालिका व नगरपालिकांचे अध्यक्ष आहेत.
शिक्षक संघ कोणाचा, राज्यातील शिक्षक कोणाच्या मागे आहेत, हे पुन्हा एकदा दाखवून देण्यासाठी कोल्हापुरात रविवारी (दि. २३) सकाळी दहा वाजता शाहू सांस्कृतिक मंदिर येथे महामंडळ घेण्यात आले आहे. शिक्षक संघाचे नेते संभाजीराव थोरात व अखिल भारतीय शिक्षक महासंघाचे कार्यकारी अध्यक्ष प्रा. एस. डी. पाटील यांच्या प्रमुख उपस्थित होणाऱ्या या महामंडळासाठी राज्यातील किमान चार हजार, तर कोल्हापुरातील दोन हजार शिक्षक उपस्थित राहणार असल्याचे पाटील यांनी सांगितले. (प्रतिनिधी)

Web Title: Rajaram Verma will take action against

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.