भुयेवाडीतील जवान राजाराम साळोखे यांचे छत्तीसगडमध्ये निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 04:18 IST2021-06-17T04:18:07+5:302021-06-17T04:18:07+5:30

कोल्हापूर : केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बलाचे (सीआयएसएफ) चे भुयेवाडी (ता. करवीर) येथील जवान राजाराम यशवंत साळोखे (वय ५३) यांचे ...

Rajaram Salokhe, a jawan from Bhuyewadi, died in Chhattisgarh | भुयेवाडीतील जवान राजाराम साळोखे यांचे छत्तीसगडमध्ये निधन

भुयेवाडीतील जवान राजाराम साळोखे यांचे छत्तीसगडमध्ये निधन

कोल्हापूर : केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बलाचे (सीआयएसएफ) चे भुयेवाडी (ता. करवीर) येथील जवान राजाराम यशवंत साळोखे (वय ५३) यांचे देशसेवा बजावताना छत्तीसगड येथे बुधवारी हृदयविकाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, मुलगी, आई, भाऊ असा परिवार आहे.

१९९१ मध्ये ते ‘सीआयएसएफ’ या दलामध्ये भरती झाले होते. गेली ३० वर्षे ते सेवा बजावत होते. २०१८ पासून छत्तीसगडमधील बीएसपी भिलाई युनिट या ठिकाणी ते हेड कॉन्स्टेबल म्हणून सेवा बजावत होते. तेथेच त्यांचे निधन झाले. त्यांचे पार्थिव त्यांच्या मूळ गावी भुयेवाडी येथे आज, गुरुवारी सकाळी आणण्यात येणार आहे, सकाळी ११ वाजता शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

फोटो नं. १६०६२०२१-कोल-राजाराम साळोखे (निधन-सीआयएसएफ)

===Photopath===

160621\16kol_14_16062021_5.jpg

===Caption===

फोटो नं. १६०६२०२१-कोल-राजाराम साळोखे (निधन-सीआयएसएफ)

Web Title: Rajaram Salokhe, a jawan from Bhuyewadi, died in Chhattisgarh