राजाराम कारखान्यात पी. जी. मेढे यांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:31 IST2021-09-10T04:31:41+5:302021-09-10T04:31:41+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क कसबा बावडा : येथील छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याचे मानद तज्ज्ञ सल्लागार पी. जी. मेढे ...

Rajaram factory p. G. Medhe felicitated | राजाराम कारखान्यात पी. जी. मेढे यांचा सत्कार

राजाराम कारखान्यात पी. जी. मेढे यांचा सत्कार

लोकमत न्यूज नेटवर्क

कसबा बावडा : येथील छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याचे मानद तज्ज्ञ सल्लागार पी. जी. मेढे यांचा अमृतमहोत्सवी वाढदिवस गोकुळचे माजी चेअरमन अरुण नरके यांच्याहस्ते व माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्या अध्यक्षतेखाली कारखान्यात नुकताच संपन्न झाला. यावेळी कारखान्याचे चेअरमन दिलीप पाटील, व्हा. चेअरमन वसंत बेनाडे, माजी आमदार अमल महाडिक यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी अरुण नरके म्हणाले, मेढे यांचे साखर उद्योगात मोठे योगदान आहे. साखर उद्योगाच्या समस्या निराकरणासाठी मेढे यांनी मोठे परिश्रम घेतले आहे. ते कदापिही विसरता कामा नये.

महादेवराव महाडिक म्हणाले, कारखान्याची आर्थिक घडी सुस्थितीत राखण्यासाठी मेढे यांचे योगदान मोलाचे आहे. मेढे यांनी कारखान्यासाठी दिलेले सहकार्य मी नजरेआड करू शकत नाही. सेवानिवृत्तीनंतरही काम करत असताना त्यांनी कोणतीही अपेक्षा ठेवली नाही.

सत्काराला उत्तर देताना पी. जी. मेढे म्हणाले, गेल्या ४० वर्षांत साखर उद्योगातील दिलेल्या सेवेबाबत आपण समाधानी आहे. माझा ध्यास आणि श्वास हा साखर उद्योग आहे.

यावेळी कारखान्याचे कार्यकारी संचालक प्रकाश चिटणीस, सेक्रेटरी उदय मोरे तसेच कारखान्याच्या विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

फोटो:

राजाराम कारखान्याचे मानद तज्ज्ञ संचालक पी. जी मेढे यांचा अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त गोकुळचे माजी चेअरमन अरुण नरके यांच्याहस्ते व माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्या अध्यक्षतेखाली सत्कार करण्यात आला. यावेळी माजी आमदार अमल महाडिक, कारखान्याचे चेअरमन दिलीप पाटील, व्हा. चेअरमन वसंत बेनाडे, कार्यकारी संचालक प्रकाश चिटणीस, सेक्रेटरी उदय मोरे आदी उपस्थित होते.

Web Title: Rajaram factory p. G. Medhe felicitated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.