शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

दमदार पावसाने राजाराम बंधारा पाण्याखाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2020 13:11 IST

दमदार पावसाने काल राजाराम बंधारा पाण्याखाली गेला. यामुळे या बंधाऱ्यावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे.

ठळक मुद्देपावसामुळे कसब बावडा येथील राजाराम बंधारा पाण्याखालीबंधाऱ्यावरील वाहतूक बंद

कसबा बावडा : गेल्या तीन-चार दिवसांपासून पडत असलेल्या दमदार पावसामुळे कसबा बावडा (ता. करवीर ) येथील राजाराम बंधारा काल सायंकाळी चारच्या सुमारास पाण्याखाली गेला. सध्या बंधाऱ्याजवळ १८ फूट इतकी पाणीपातळी झाली आहे. बंधारा पाण्याखाली गेल्याने या मार्गावर होणारी बावडा - वडणगे वाहतूक आता ठप्प झाली आहे.पुराच्या पाण्याचा बंधाऱ्याला धोका पोहोचू नये म्हणून मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात बंधाऱ्याच्या प्लेटा काढून टाकण्यात आल्या होत्या. त्यामुळे बंधाऱ्याजवळची पाणी पातळी सहा फूट इतकी खाली गेली होती. मात्र राधानगरी, तुळशी आणि कुंभी जलाशयामधून पाणी सोडल्यामुळे अवघ्या दोन दिवसात पाणीपातळीत वाढ होऊन ती पुन्हा दहा फुटांपर्यंत गेली. त्यातच गेल्या तीन-चार दिवसांपासून धरण क्षेत्रात दमदार पाऊस झाल्याने पाणीपातळी झपाट्याने वाढ झाली आणि बंधारा पाण्याखाली गेला. सध्या बंधाऱ्याजवळ १८ फूट इतकी पाणी पातळी आहे.दरम्यान बंधारा पाण्याखाली गेल्याने या मार्गावरून औद्योगिक वसाहतीकडे कामासाठी ये-जा करणाऱ्या वाहनधारकांना आता लांबचा पल्ला टाकून यावे लागणार आहे. बंधारा पाण्याखाली गेल्याने तो पाहण्यासाठी बंधाऱ्यावर नागरिकांनी गर्दी करण्यास सुरुवात केली आहे. 

टॅग्स :RainपाऊसDamधरणkolhapurकोल्हापूर