राजाराम काॅलेज कर्मचारी संघटना वर्धापन दिन उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 04:23 IST2021-03-19T04:23:19+5:302021-03-19T04:23:19+5:30

कोल्हापूर : राजाराम काॅलेज कर्मचारी संघटनेचा पहिला वर्धापन दिन राजर्षी शाहू छत्रपती सभागृहात गुरुवारी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. ...

Rajaram College Employees Union Anniversary Excitement | राजाराम काॅलेज कर्मचारी संघटना वर्धापन दिन उत्साहात

राजाराम काॅलेज कर्मचारी संघटना वर्धापन दिन उत्साहात

कोल्हापूर : राजाराम काॅलेज कर्मचारी संघटनेचा पहिला वर्धापन दिन राजर्षी शाहू छत्रपती सभागृहात गुरुवारी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. अध्यक्षस्थानी प्राचार्य डाॅ. अण्णासाहेब खेमणार होते.

यानिमित्त वर्षभरात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या प्राध्यापक, कर्मचाऱ्यांचा शाल, पुस्तक व पुष्प देऊन सत्कार करण्यात आला. राज्य सरकारी मध्यवर्ती संघटनेचे सरचिटणीस अनिल लवेकर, अध्यक्ष वसंतराव डावरे, उपाध्यक्ष प्रकाश पाटील,संजय क्षीरसागर यांनी अनुकंपा भरती, सेवा पुस्तके अद्ययावत कशी करावीत. याबद्दलचे मार्गदर्शन केले.

संघटनेस सर्वतोपरी सहकार्य करून कोणतेही काम अपूर्ण राहणार नाही. अशी ग्वाही प्राचार्य डाॅ. खेमणार यांनी दिली. स्वागत राजाराम काॅलेज कर्मचारी संघटनेचे सचिव नंदकुमार इंगवले आणि प्रास्ताविक अध्यक्ष सुधाकर भांदिगरे व प्रज्ञा बेलेकर यांनी आभार मानले.

यावेळी शिवाजी विद्यापीठ आजी माजी कृती समितीचे डाॅ. प्रवीण कोडोलीकर, रमेश पाटील, निवास शिंदे, ज्ञानेश्वर हजारे, गजानन पाटील, कृष्णात बुवा, रवींद्र आरगे, मौला शिकलगार, अमित धनगर, सुप्रिया पोवार, पद्मा पाटील, अनुराधा पाटील, आदी उपस्थित होते.

Web Title: Rajaram College Employees Union Anniversary Excitement