शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
2
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
3
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
4
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
5
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
6
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
7
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
8
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
9
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
10
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
11
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
12
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
13
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
14
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
15
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
16
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
17
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
18
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
19
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
20
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक

 ‘कोल्हापूर चेंबर’तर्फे राजाभाऊ शिरगावकर, राम मेनन, प्रकाश गद्रे यांचा पुरस्काराने सन्मान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2018 15:03 IST

कोल्हापूर येथील कोल्हापूर चेंबर आॅफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजची (केसीसीआय) ३५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा आणि पुरस्कार वितरण कार्यक्रमात ते बोलत होते. दिगंबर जैन बोर्डिंगच्या सभागृहातील या कार्यक्रमास चेंबर आॅफ असोसिएशन आॅफ महाराष्ट्र इंडस्ट्रीज अँड ट्रेडचे प्रेसिडेंट दीपेन आगरवाल प्रमुख उपस्थित होते.

ठळक मुद्दे ‘कोल्हापूर चेंबर’तर्फे राजाभाऊ शिरगावकर, राम मेनन, प्रकाश गद्रे यांचा पुरस्काराने सन्मान व्यापार टिकविण्यासाठी एकजूट आवश्यक : मोहन गुरनानी

कोल्हापूर : किरकोळ क्षेत्रातील परकीय थेट गुंतवणुकीचे (एफडीआय रिटेल) मोठे संकट आपल्यासमोर येऊन ठेपले आहे. त्याचा सामना करून आपला पारंपरिक व्यापार, व्यवसाय टिकविण्यासाठी देशातील सर्व व्यापारी, व्यावसायिकांनी एकजूट राखणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन चेंबर आॅफ असोसिएशन आॅफ महाराष्ट्र इंडस्ट्रीज अँड ट्रेडचे चेअरमन मोहन गुरनानी यांनी येथे केले.येथील कोल्हापूर चेंबर आॅफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजची (केसीसीआय) ३५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा आणि पुरस्कार वितरण कार्यक्रमात ते बोलत होते. दिगंबर जैन बोर्डिंगच्या सभागृहातील या कार्यक्रमास चेंबर आॅफ असोसिएशन आॅफ महाराष्ट्र इंडस्ट्रीज अँड ट्रेडचे प्रेसिडेंट दीपेन आगरवाल प्रमुख उपस्थित होते. गुरनानी आणि आगरवाल यांनी ‘व्यापार- काल, आज आणि उद्याचा’ या विषयावर मार्गदर्शन केले.

‘शिवाजीराव देसाई विशेष सेवा पुरस्कार’ हा ज्येष्ठ उद्योगपती राजाभाऊ शिरगावकर यांच्या वतीने सचिन आणि सोहन शिरगावकर यांना, ‘परशराम ऊर्फ बापूसाहेब जाधव उद्योग पुरस्कार’ हा ज्येष्ठ उद्योगपती राम मेनन यांच्या वतीने सचिन मेनन यांना, तर ‘वर्धीभाई परीख व्यापार पुरस्कार’ हा ज्येष्ठ व्यापारी प्रकाश गद्रे यांना प्रमुख उपस्थितांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. मानपत्र, स्मृतिचिन्ह, शाल आणि रोप असे पुरस्कारांचे स्वरूप होते.

चेअरमन गुरनानी म्हणाले, मोठी लोकसंख्या आणि विकसनशीलतेमुळे परदेशांतील रिटेल व्यापाऱ्यांची भारतातील बाजारपेठेवर नजर आहे. त्यामुळे ‘एफडीआय रिटेल’च्या माध्यमातून असे व्यापारी आपल्या देशात येण्याचा प्रयत्न करीत आहे. एफडीआय रिटेलमुळे आपला व्यापार धोक्यात येणार आहे. आपला पारंपरिक, नवा व्यापार टिकविण्यासाठी एफडीआय रिटेलला देशबाहेरच ठेवण्यासाठी एकजुटीद्वारे लढा देणे आवश्यक आहे.

केंद्र सरकारने एफडीआय रिटेलच्या निर्णयाबाबत फेरविचार करणे आवश्यक आहे. प्रेसिडेंट आगरवाल म्हणाले, पूर्वीचा व्यापार हा नैतिकता, व्यावहारिकतेवर अवलंबून होता. आज व्यापारात संभ्रमावस्था आहे. भविष्यातील व्यापार आधुनिक पद्धतीचा असणार आहे. तंत्रज्ञान आत्मसात करून वेळेनुसार व्यापारात बदल करणे आवश्यक आहे. एफडीआय रिटेल कोणत्याही परिस्थितीत आपल्या देशात, राज्यात येणार नाही, यासाठी संघटितपणे आपण कार्यरत राहणे आवश्यक आहे.या कार्यक्रमात सचिन शिरगावकर, सचिन मेनन, सुबोध गद्रे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी ‘केसीसीआय’चे उपाध्यक्ष शिवाजीराव पोवार, चंद्रकांत जाधव, मानद सचिव जयेश ओसवाल, धनंजय दुग्गे, संजय पाटील, उद्योजक दिलीप मोहिते, एम. बी. शेख, सुरेंद्र जैन, आदी उपस्थित होते. ‘केसीसीआय’चे अध्यक्ष संजय शेटे यांनी प्रास्ताविक केले.

माजी अध्यक्ष प्रदीपभाई कापडिया यांनी पाहुण्यांची ओळख करून दिली. आनंद माने यांनी मानपत्राचे वाचन केले. ललित गांधी यांनी पुरस्कारांची माहिती दिली. राजकुमार चौगुले, पार्श्वनाथ पाटील यांनी सूत्रसंचालन केले. खजिनदार हरिभाई पटेल यांनी आभार मानले.

या सभासदांचा सत्कारउल्लेखनीय कामगिरी, विविध पदांवर निवड झाल्याबद्दल ‘केसीसीआय’च्या सभासदांचा प्रमुख उपस्थितांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्यामध्ये शशिताई देसाई, व्ही. बी. पाटील, ललित गांधी, मदन पाटील, अश्विनी दानीगोंड, सुरेश रोटे, राजीव परीख, भरत ओसवाल, संजय पाटील, नयन प्रसादे, सीमा जोशी यांचा समावेश होता.

 

 

टॅग्स :businessव्यवसायkolhapurकोल्हापूर