ए.राजा यांनी मागितली मुख्यमंत्र्यांची माफी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2021 04:14 IST2021-03-30T04:14:50+5:302021-03-30T04:14:50+5:30

चेन्नई : तामिळनाडूचे मुख्यमंंत्री ई. पलानीसामी यांच्या दिवंगत आईविषयी केलेल्या आक्षेपार्ह टीकेबद्दल द्रमुकचे नेते, खासदार ए. राजा यांनी सोमवारी ...

A. Raja apologizes to the Chief Minister | ए.राजा यांनी मागितली मुख्यमंत्र्यांची माफी

ए.राजा यांनी मागितली मुख्यमंत्र्यांची माफी

चेन्नई : तामिळनाडूचे मुख्यमंंत्री ई. पलानीसामी यांच्या दिवंगत आईविषयी केलेल्या आक्षेपार्ह टीकेबद्दल द्रमुकचे नेते, खासदार ए. राजा यांनी सोमवारी मुख्यमंत्र्यांची माफी मागितली. आपल्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आल्याचा दावा ए. राजा यांनी केला. रविवारी एका सभेदरम्यान मुख्यमंत्री पलानीसामी हे टीकेवरून भावुक झाले होते. हा मुद्दा आणखी चिघळण्याची शक्यता असल्याने राजा यांनी माफी मागत त्यावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.

गुडलूर येथील जनसभेत राजा यांनी स्पष्ट केले की, मुख्यमंत्री पलानीसामी यांच्यावर वैयक्तिक टीका करण्याचा आपला कोणताही विचार नव्हता. तसेच त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या आईचा अपमान करण्याचा उद्देशदेखील नव्हता. आपण एका मुलाचे उदाहरण देत पलानीसामी आणि एम. के स्टॅलिन यांच्यामध्ये तुलना करण्याचा प्रयत्न केला होता. माझ्या बोलण्याचा चुकीचा अर्थ लावण्यात आला. माझे वक्तव्य चुकीच्या पद्धतीने मांडण्यात आले. पलानीसामी हे त्यामुळे व्यथित झाल्याचे ऐकून मला दु:ख झाले. मी त्याबद्दल माफी मागतो, असे ए. राजा यांनी सांगितले.

शुक्रवारी एका सभेदरम्यान ए. राजा यांनी मुख्यमंत्री पलानीसामी यांच्याविषयी आक्षेपार्ह टीका केली होती. त्यावरून तामिळनाडूच्या राजकारण वाद पेटला होता. द्रमुक नेते एम. के स्टॅलिन यांनी याची दखल घेत नेत्यांनी टीका करताना विरोधी पक्षातील नेत्यांचा सन्मान ठेवावा, असा कोणाचेही नाव न घेता सल्ला दिला होता. तामिळनाडूतील इतर पक्ष, नेत्यांनीसुद्धा राजा यांच्या टीकेचा निषेध केला होता.

Web Title: A. Raja apologizes to the Chief Minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.