शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

पूरग्रस्त भागातील ६५५ टन कचरा उठाव, प्रशासक बलकवडे यांनी केली पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 11:27 IST

Kolhpaur Flood Muncipalty : कोल्हापूर महानगरपालिका आरोग्य विभागाने पूरबाधित क्षेत्रातील राबविलेल्या स्वच्छता मोहिमेत गेल्या तीन दिवसांत ६५५ टन कचरा व गाळ उठाव करण्यात आला. स्वच्छता, औषध फवारणी, तसेच रस्ते पाण्याने धुण्याच्या मोहिमेत महानगरपालिकेचे दोन हजार कर्मचारी राबत आहेत. दरम्यान, नवी मुंबई महानगरपालिकेचे ३६ कर्मचाऱ्यांचे एक पथक कोल्हापुरात मंगळवारी सायंकाळी दाखल झाले आहे.

ठळक मुद्देपूरग्रस्त भागातील ६५५ टन कचरा उठाव, प्रशासक बलकवडे यांनी केली पाहणीनवी मुंबईचे एक पथक कोल्हापुरात दाखल

कोल्हापूर : महानगरपालिका आरोग्य विभागाने पूरबाधित क्षेत्रातील राबविलेल्या स्वच्छता मोहिमेत गेल्या तीन दिवसांत ६५५ टन कचरा व गाळ उठाव करण्यात आला. स्वच्छता, औषध फवारणी, तसेच रस्ते पाण्याने धुण्याच्या मोहिमेत महानगरपालिकेचे दोन हजार कर्मचारी राबत आहेत. दरम्यान, नवी मुंबई महानगरपालिकेचे ३६ कर्मचाऱ्यांचे एक पथक कोल्हापुरात मंगळवारी सायंकाळी दाखल झाले आहे.रविवारच्या मोहिमेत १०० टन, सोमवारच्या मोहिमेत ३०० टन, तर मंगळवारच्या स्वच्छता मोहिमेत २५५ टन कचरा व गाळ उठाव करण्यात आला. शहरातील पूरबाधित क्षेत्रात साचलेला गाळ व कचरा उठाव, औषध व धूर फवारणीची ही मोहीम शुक्रवारअखेर सुरू राहणार आहे.महापालिका प्रशासक कादंबरी बलकवडे यांनी मंगळवारी दुपारी स्वच्छता मोहिमेदरम्यान संवाद साधला. यावेळी बलकवडे यांनी स्वच्छता मोहिमेदरम्यान ताराबाई पार्क, कदमवाडी, कुंभार गल्ली, कपूर वसाहत, साळोखे पार्क कदमवाडी या ठिकाणी पाहणी केली. स्थानिक नागरिकांशी संवाद साधून आपल्या परिसरात स्वच्छता, औषध व धूर फवारणी करण्यात येते का याची खात्री करून घेतली. शाहूपुरी कुंभार गल्ली येथील धोकादायक घरामधील नागरिकांना तातडीने निवारा केंद्राच्या ठिकाणी स्थालांतरित करण्याच्या सूचना बलकवडे यांनी उपशहर अभियंता बाबूराव दबडे यांना दिल्या. मुंबईची दोन जेट मशीन कोल्हापुरातमुंबई महानगरपालिकेकडून कोल्हापूरला दोन जेट कम सक्शन वाहने उपलब्ध करून‍ दिली आहेत. या सक्शन वाहनाद्वारे शहरातील प्रमुख ड्रेनेज लाईन साफ करणे व चोकअप काढण्याचे काम महापालिकेने युद्धपातळीवर सुरू केले.नवी मुंबईहून ३६ कर्मचाऱ्यांचे पथक दाखल प्रशासक बलकवडे यांनी नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त अभिजित बांगर यांना फोनवरून महानगरपालिका क्षेत्रातील पूर ओसरू लागल्याने स्वच्छतेसाठी नवी मुंबई महानगरपालिकेची पथक पाठवून सहकार्य करण्याबाबत चर्चा केली होती. त्यानुसार ३६ कर्मचाऱ्यांचे पथक कोल्हापुरात दाखल झाले आहे.

टॅग्स :Kolhapur Floodकोल्हापूर पूरMuncipal Corporationनगर पालिकाkolhapurकोल्हापूर