महास्वच्छता अभियानात एक टन कचरा उठाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 04:21 IST2021-02-15T04:21:05+5:302021-02-15T04:21:05+5:30

कोल्हापूर : शहरामध्ये झालेल्या महास्वच्छता अभियानात एक टन कचरा व प्लास्टिक गोळा करण्यात आले. मोहिमेचा ९४ वा रविवार असून ...

Raise a ton of garbage in the Mahasvachchata Abhiyan | महास्वच्छता अभियानात एक टन कचरा उठाव

महास्वच्छता अभियानात एक टन कचरा उठाव

कोल्हापूर : शहरामध्ये झालेल्या महास्वच्छता अभियानात एक टन कचरा व प्लास्टिक गोळा करण्यात आले. मोहिमेचा ९४ वा रविवार असून सामाजिक संघटनांसह आजी-माजी नगरसेवकांनी सहभाग घेतला. महापालिका प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांच्या मार्गदर्शनाखाली मोहीम झाली.

ताराराणी चौक ते तावडे हॉटेल संपूर्ण परिसर, सायबर चौक ते ‍शिवाजी विद्यापीठ मेन रोड परिसर, सीपीआर चौक ते तोरस्कर चौक, पंचगंगा घाट, स्मशानभूमी, माऊली पुतळा ते जनता बाझार, क्रीडा संकुल मेन रोड, रंकाळा परिसर येथे स्वच्छता केली. स्वरा फाैंडेशनच्यावतीने पंचगंगा घाट, रंकाळा येथे स्वच्छता करून वृक्षारोपण केले.

यावेळी प्रमोद माजगावकर, आरोग्याधिकारी डॉ. अशोक पोळ, मुख्य आरोग्य निरीक्षक जयवंत पवार, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. विजय पाटील, माजी नगरसेवक विलास वास्कर, सविता पाडळकर, पियुष हुलस्वार, फैजान देसाई, यश रुकडीकर, मुकुंद कांबळे, मानसी कांबळे, काका पडळकर, शेखर वडणगेकर आदी उपस्थित होते.

चौकट

महापालिकेची यंत्रणा

४ जेसीबी, ५ डंपर, ६ आरसी गाडया, १ ट्रॅक्टर-ट्रॉली, २ औषध फवारणी, १ पाणी टँकर, १३० महापालिका कर्मचारी.

फोटो : १४०२२०२१ कोल केएमसी स्वच्छता१

ओळी : महापालिकेच्यावतीने रविवारी शहरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.

Web Title: Raise a ton of garbage in the Mahasvachchata Abhiyan