महास्वच्छता अभियानात तीन टन कचरा उठाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2020 04:17 IST2020-12-07T04:17:06+5:302020-12-07T04:17:06+5:30
कोल्हापूर : शहरामध्ये झालेल्या महास्वच्छता अभियानामध्ये तीन टन कचरा व प्लास्टिक गोळा करण्यात आले. मोहिमेचा हा ८४ वा रविवार ...

महास्वच्छता अभियानात तीन टन कचरा उठाव
कोल्हापूर : शहरामध्ये झालेल्या महास्वच्छता अभियानामध्ये तीन टन कचरा व प्लास्टिक गोळा करण्यात आले. मोहिमेचा हा ८४ वा रविवार असून या अभियानामध्ये महापालिका प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांची प्रमुख उपस्थिती हाेती.
स्वरा फौंडेशनच्या वतीने पंचगंगा नदीघाट परिसरात स्वच्छता करण्यात आली. माझी वसुंधरा अभियानांतर्गत मैलखड्डा व कोटीतीर्थ तलाव येथे ५० वृक्षांचे रोपण करण्यात आले. यावेळी प्रमोद माजगावकर, अमित देशपांडे, विकी महाडिक, प्राजक्ता माजगावकर, अमृता वास्कर, धर्मराज पाडळकर, साक्षी गुंड, सुनीता मेघाणे यांच्यासह भूजल सर्वेक्षण विभाग, महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
चौकट
डॉ. कलशेट्टी यांनीही केली स्वच्छता
कोल्हापूर महापालिकेच्या माध्यमातून तत्कालीन आयु्क्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी स्वच्छता मोहीम सुरू केली. कोल्हापूरकरांनी याला उत्स्फूर्त प्रतिसाद देत सलग ८४ रविवार मोहीम सुरू ठेवली आहे. डॉ. कलशेट्टी रविवारी कोल्हापुरात आले होते. महापालिकेचे आयु्क्त नसतानाही त्यांनी अवर्जुन स्वच्छता मोहिमेत सहभाग घेतला.
तलावात कचरा टाकणाऱ्यांना दंड
कोटीतीर्थ तलावाच्या परिसरात प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. तलावामध्ये नागरिकांनी कचरा टाकू नये असे आवाहन त्यांनी केले. जर कोणी कचरा टाकत असेल तर त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करावी, असे आदेश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
महापालिकेची यंत्रणा
तीन जेसीबी, तीन डंपर, तीन औषध फवारणी टँकर, महापालिकेचे ८० कर्मचारी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे १० कर्मचारी
स्वच्छ केलेला परिसर
कोटीतीर्थ तलाव परिसर, साने गुरुजी वसाहत मुख्य रस्ता, महावीर कॉलेज ते खानविलकर पेट्रोल पंप, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत परिसर, बावडा मुख्य रस्ता, सम्राटनगर मुख्य रस्ता, जैन बोर्डिंग मुख्य रस्ता परिसर.
फोटो : ०६१२२०२० कोल केएमसी स्वच्छता१
ओळी : कोल्हापूर महापालिकेच्या वतीने रविवारी शहरात स्वच्छता मोहीम राबविली. यावेळी प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी मोहिमेत सहभाग नोंदविला.
फोटो : ०६१२२०२० कोल केएमसी स्वच्छता२
ओळी : कोल्हापूर महापालिकेच्या वतीने रविवारी स्वच्छता मोहिमेसोबत वृक्षरोपणाचीही मोहीम राबविली.
बातमीदार : विनोद