शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
3
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
4
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
5
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
6
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
7
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
8
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
9
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
10
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
11
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
12
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
13
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
14
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
15
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
17
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
18
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
19
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
20
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
Daily Top 2Weekly Top 5

पावसाचा जोर वाढला, पंचगंगा इशारा पातळीच्याही खाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 19:21 IST

Rain Kolhapur : चार दिवसांपासून उसंत घेतलेल्या पावसाने गुरुवारी रात्रीपासून जोर धरल्याने चिंता वाढली आहे. शुक्रवारी दिवसभर थांबून थांबून पावसाच्या सरी कोसळत राहिल्या. पावसाने पुनरागमन केल्याने महापूर ओसरण्याचा वेगही कमी झाला असून मदतकार्यातही अडथळे येत आहेत. पूर ओसरलेल्या भागात या पावसाने चिखलाचा काला झाल्याचे दिसत आहे.

ठळक मुद्देपावसाचा जोर वाढलापंचगंगा इशारा पातळीच्याही खाली

कोल्हापूर : चार दिवसांपासून उसंत घेतलेल्या पावसाने गुरुवारी रात्रीपासून जोर धरल्याने चिंता वाढली आहे. शुक्रवारी दिवसभर थांबून थांबून पावसाच्या सरी कोसळत राहिल्या. पावसाने पुनरागमन केल्याने महापूर ओसरण्याचा वेगही कमी झाला असून मदतकार्यातही अडथळे येत आहेत. पूर ओसरलेल्या भागात या पावसाने चिखलाचा काला झाल्याचे दिसत आहे.

दरम्यान पंचगंगा नदी शुक्रवारी दुपारनंतर ३९ फूट या इशारा पातळीच्या खालून वाहू लागली. भोगावती वगळता सर्वच नद्या अजूनही पात्राबाहेरूनच वाहत असल्याने नदीकाठ पाण्याखालीच आहे.

जिल्ह्यात मागील आठवड्यात झालेल्या तीन दिवसांच्या ढगफुटीसारख्या पावसाने महापुराचे सर्वच रेकॉर्ड मोडले. सोमवारपासून पावसाने उसंत घेतल्याने महापुराचा विळखा वेगाने सैल होत होता; पण दोन-तीन दिवसांच्या उघडिपीनंतर लगेच गुरुवारी रात्रीपासून पावसाने दमदार सुरुवात केल्याने पुरातून सावरण्याच्या सुरू असलेल्या प्रयत्नावर पाणी फिरू लागले आहे. अजूनही जिल्ह्यातील ३२ बंधारे पाण्याखाली आहेत. ३० च्या वर वाहतूक मार्ग बंद आहेत, शिरोळ तालुक्यातील अनेक गावांना अजूनही पुराच्या पाण्याचा वेढा कायम आहे, अशा परिस्थितीत पावसाची उसंत अपेक्षित होती.

पूर ओसरेल तसे लोक निवारागृहातून घराकडे परतत होते, स्वच्छता सुरू होती; पण शुक्रवारी दिवसभर कोसळणाऱ्या पावसामुळे या सर्वांच्या प्रयत्नांत व्यत्यय आला आहे. पूरग्रस्त भागात आधीच चिखलाचे साम्राज्य पसरले आहे, या पावसाने त्याचा अक्षरश: काला झाला असून तो रस्त्यावर पसरल्याने दैन्यावस्थेत आणखी भर पडली आहे.कसबा बावडा ते शिये मार्ग खुलापंचगंगा नदीची पाणीपातळी राजाराम बंधाऱ्यावर शुक्रवारी संध्याकाळी पाच वाजता ३७.७ फुटांपर्यंत खाली आली आहे. पाणी कमी झाल्याने कसबा बावडा ते शिये या मार्गावरील वाहतूक आठवडाभरानंतर सुरू झाली आहे; पण अजूनही रस्त्यावर गाळ व शेवाळ असल्याने रस्ता निसरडा झाला आहे. 

टॅग्स :Rainपाऊसkolhapurकोल्हापूर