शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर जिल्ह्यात पावसाने घेतली उसंत; पंचगंगेची पातळी झाली कमी, बारा बंधारे झाले मोकळे 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2025 12:12 IST

धरणातील विसर्गही झाला कमी

कोल्हापूर : जिल्ह्यात पावसाची उघडझाप सुरू आहे. अधूनमधून जोरदार सरी कोसळत आहेत. धरणक्षेत्रातही पाऊस कमी असल्याने विसर्ग कमी झाला आहे. पंचगंगेची पातळी २६ फुटांपर्यंत खाली आली असून, दिवसभरात बारा बंधारे पाण्याखालून मोकळे झाले आहेत.गेल्या पाच दिवसांपासून जिल्ह्यात पावसाने उसंत घेतली आहे. सोमवारी सकाळी ऊन पडले, दुपारी ढगाळ वातावरणासह अनेक ठिकाणी जोरदार पाऊस कोसळला. धरणातील विसर्ग कमी झाला असून, राधानगरी धरणातून प्रतिसेंकद १५००, दूधगंगा धरणातून १६००, तर वारणातून ४७३६ घनफूट पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे नद्यांची पातळी झपाट्याने कमी होऊ लागली आहे.पंचगंगा नदीची पातळी सोमवारी २९.१० फुटांवर होती, सायंकाळपर्यंत ती २६ फुटांपर्यंत खाली आली होती. दिवसभरात बारा बंधारे मोकळे झाले आहेत. इतर जिल्हा मार्ग ९, तर ग्रामीण मार्ग २८, असे ३७ मार्गांवर अद्यापही पाणी असल्याने वाहतुकीस बंद आहेत.दरम्यान, सोमवारी सकाळी आठ वाजता संपलेल्या चोवीस तासांत जिल्ह्यात सरासरी २.९ मिलिमीटर पाऊस झाला. गगनबावडा तालुक्यात ७.७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून, दहा खासगी मालमत्तांची पडझड होऊन तीन लाख १२ हजारांचे नुकसान झाले आहे.