शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर जिल्ह्यात पावसाने पुन्हा जोर पकडला, राधानगरी, वारणा धरणातून विसर्ग सुरुच

By राजाराम लोंढे | Updated: August 2, 2024 16:49 IST

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात शुक्रवारपासून पावसाने पुन्हा जोर पकडला असून धरणक्षेत्रात धुवांधार पाऊस कोसळत आहे. राधानगरी धरणाचे तीन स्वयंचलित ...

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात शुक्रवारपासून पावसाने पुन्हा जोर पकडला असून धरणक्षेत्रात धुवांधार पाऊस कोसळत आहे. राधानगरी धरणाचे तीन स्वयंचलित दरवाजे खुले असल्याने पंचगंगा नदीच्या पातळीत पुन्हा वाढ होऊ लागली आहे. धोका पातळीकडे वाटचाल सुरू केली आहे, त्यात दिवसभरातील पाऊस पाहता कोल्हापूरकरांची पुन्हा धाकधूक वाढली आहे.हवामान विभागाने गुरुवार व शुक्रवार दोन दिवस कोल्हापूरसाठी ‘ऑरेंज अलर्ट’ दिला होता. त्यानुसार पाऊस सुरू असून गुरुवारच्या तुलनेत शुक्रवारी जोर अधिक आहे. जोरदार सरी कोसळत असल्याने सगळीकडे पुन्हा पाणी पाणी झाले आहे. पुराचे पाणी हळूहळू कमी होऊ लागले होते, मात्र पावसाचा जोर वाढल्याने ते पुन्हा वाढू लागले आहे.धरणक्षेत्रातही जोरदार पाऊस सुरू आहे. राधानगरी धरणातून प्रतिसेकंद ५७८४, वारणातून ११५५२ तर दुधगंगेतून ९१०० घनफूट पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने पुराच्या पाण्याची फुग वाढू लागली आहे. पंचगंगा नदीची पुन्हा धोक्याकडे वाटचाल सुरू असल्याने कोल्हापूरकरांची चिंता वाढली आहे. दुपारी एक नंतर पुराचे पाणी हळूहळू वाढू लागले आहे.दरम्यान, शनिवारपासून दोन दिवस जिल्ह्यात ‘यलो अलर्ट’ हवामान विभागाने दिला असला तरी सध्याचा जोर पाहता पाऊस अडचणी वाढवण्याची शक्यता आहे.

पडझड काही थांबेनायंदा पावसाबरोबर मालमत्तांची पडझड थांबण्याचे नाव घेईना. शुक्रवारी सकाळी आठ वाजता संपलेल्या चोवीस तासात १४३ खासगी मालमत्तांची पडझड होऊन ५१ लाख ७१ हजारांचे नुकसान झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.

चार तालुक्यांनी वार्षिक सरासरी ओलांडली

हातकणंगले, शाहूवाडी, कागल व भुदरगड तालुक्यांनी पावसाची वार्षिक सरासरी ओलांडली आहे. शिरोळ, पन्हाळा, करवीर, गडहिंग्लज तालुक्यात वार्षिक सरासरीच्या ८० टक्क्यांपेक्षा अधिक पाऊस झाला आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरfloodपूरRainपाऊस