शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी, इंडिगोने नागपुरमध्ये आपत्कालीन लँडिंग केले
2
काही तरी मोठं होणार...! इस्रायल-इराण युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी अर्ध्यावरच सोडली G7 परिषद, नेमकं काय घडलं?
3
धक्कादायक! आधी फोटो काढून व्हायरल करण्याची धमकी दिली; नराधमांनी प्रियकरासमोर तरुणीवर सामूहिक अत्याचार केला
4
विमानाच्या उड्डाणावेळी इंजिनावर कोंबड्या का फेकल्या जातात?; 'डेड चिकन टेस्ट' जाणून घ्या
5
बुधादित्य त्रिग्रही धनयोग: ५ राशींना लक्ष्मी कृपेने भरभराट, भरघोस शुभ-लाभ; भाग्योदयाचा काळ!
6
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
7
वैभव दादासारखंच नाव कमवायचंय! बिहारच्या १३ वर्षीय पोरानं १३४ चेंडूत कुटल्या ३२७ धावा
8
93 वर्षीय आजोबाने पूर्ण केले आजीचे स्वप्न; ज्वेलरच्या या कृतीने जिंकले मन, व्हिडिओ तुफान व्हायरल
9
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट; सोनमला मदत करणारे 'ते' दोघे कोण?
10
"आता राज ठाकरे भेटतही नाहीत...", ज्येष्ठ अभिनेते मनमोहन माहिमकर यांनी व्यक्त केली खंत
11
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
12
काहीतरी गडबड..., सोनमचं पतीसोबत एवढं वैर कसं? पोलिसांकडून आता या ४ मुद्द्यांवर तपास केंद्रित    
13
कपड्यांपेक्षा अधिक मद्यावर अधिक खर्च करतोय देशातील सामान्य माणूस, केवळ एका वर्षात उडवले 'इतके' लाख कोटी
14
भारताकडे पाकिस्तानपेक्षा जास्त अण्वस्त्रे, कोणत्या देशाकडे मोठा साठा? यादी पाहा
15
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
16
...अखेर पाकिस्तान वठणीवर आला; सिंधुच्या पाण्यासाठी भारतासमोर पसरले हात
17
मुंबईकरांसाठी खुशखबर! आता वाहतूक कोंडीतून सुटका, मुंबईत धावणार वॉटर मेट्रो! किती असेल तिकीट?
18
"डॉक्टर मी प्रयोग करुन येतो, नंतर ऑपरेशन करा"; नाटकाच्या ३ तास आधी मराठी अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका
19
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
20
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी

जिल्ह्यात पावसाची उघडझाप, पंचगंगेची पातळी एक फुटाने कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2020 18:45 IST

जिल्ह्यात शुक्रवारी पावसाची उघडझाप राहिली. धरणक्षेत्रात चांगला पाऊस सुरू असून जलविसर्ग कायम आहे. नद्यांची पातळी हळूहळू कमी होत असून, पंचगंगेची पातळी दिवसभरात एक फुटाने कमी झाली आहे.

ठळक मुद्देजिल्ह्यात पावसाची उघडझापपंचगंगेची पातळी दिवसभरात एक फुटाने कमी

कोल्हापूर : जिल्ह्यात शुक्रवारी पावसाची उघडझाप राहिली. धरणक्षेत्रात चांगला पाऊस सुरू असून जलविसर्ग कायम आहे. नद्यांची पातळी हळूहळू कमी होत असून, पंचगंगेची पातळी दिवसभरात एक फुटाने कमी झाली आहे.सकाळपासून जिल्ह्यात पावसाची उघडझाप सुरू आहे. अधूनमधून जोरदार सरी कोसळत राहिल्या. कोल्हापूर शहर, करवीर, हातकणंगले, शिरोळ तालुक्यांत मात्र भुरभुरच राहिली. धरणक्षेत्रात पाऊस चांगल्या प्रकारे सुरू असून सरासरी ५० मिलिमीटर पाऊस झाला आहे. त्यामुळे धरणातील कमी असून राधानगरी धरणातून वीजनिर्मितीसाठी प्रतिसेकंद १४०० घनफूट विसर्ग सुरू आहे.

वारणा धरण ८८ टक्के भरल्याने त्यातून विसर्ग वाढवण्यात आला आहे. यातून प्रतिसेकंद ८३०१ घनफूट विसर्ग सुरू आहे. दूधगंगा धरण ९० टक्के भरले असून, त्यातून १८००, तर कासारी धरणातून १३०० घनफूट पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे नद्यांची पाणीपातळी संथगतीने कमी होत आहे.शुक्रवारी सकाळी आठ वाजता संपलेल्या २४ तासांत जिल्ह्यात सरासरी १८.४९ मिलिमीटर पाऊस झाला. पंचगंगेची पातळी सायंकाळी सहा वाजेपर्यंत २८.४ फुटांपर्यंत होती. अद्याप १९ बंधारे पाण्याखाली असून दोन राज्य व दोन प्रमुख जिल्हामार्ग बंद आहेत. जिल्ह्यातील सहा खासगी मालमत्तांची पडझड होऊन दोन लाख ७० हजार रुपयांचे नुकसान झाले.धरणांतील पाणीसाठा, टीएमसीमध्ये -राधानगरी (८.२८), तुळशी (३०.०६), वारणा (३०.१२), दूधगंगा (२२.७९), कासारी (२.२३), कडवी ( २.४४), कुंभी (२.२४), पाटगाव (३.५३). 

टॅग्स :Rainपाऊसkolhapurकोल्हापूर