शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानसोबत मॅच खेळायची असेल तर पहलगाममध्ये मारला गेलेला माझा भाऊ परत आणून द्या"
2
'ऑपरेशन सिंदूरदरम्यान काँग्रेस पाकिस्तानी सैन्याच्या बाजूने होती', पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
3
"मी शिव भक्त, सर्व विष गिळून टाकतो...", पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; म्हणाले...
4
पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास देशातून तीव्र विरोध, टीम इंडिया दबावात, ड्रेसिंग रूममधून आली अशी बातमी
5
हरमनप्रीत कौरनं रचला इतिहास; आता 'या' दिग्गज खेळाडूंसोबत घेतलं जाईल नाव!
6
Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य
7
BMW ने कार आणि बाईक्सच्या किमतीत केली मोठी कपात; तब्बल ₹१३.६ लाखांची होणार बचत...
8
सोन्याची विक्रमी झेप! आठवड्यात ३,३०० रुपयांनी महागले; चांदीचाही नवा उच्चांक, आजचा दर काय?
9
टीम इंडियाला धक्का! पाकिस्तानविरूद्धच्या सामन्याआधी शुबमन गिलच्या हाताला दुखापत, अपडेट काय?
10
Sushila Karki: 'आम्ही सत्तेचा आस्वाद घेण्यासाठी आलेलो नाही, ६ महिन्यांतच...' पंतप्रधान सुशीला कार्की 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये!
11
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
12
तुमचे LPG गॅस सिलेंडरचे अनुदान बंद झाले? घरबसल्या मोबाईलवरुन करता येईल सुरू
13
अलर्ट मोड ऑन! फेस्टिव्ह सेलच्या स्वस्ताईला भुलू नका; एक चूक अन् गमवाल आयुष्यभराची कमाई
14
शेतकऱ्यांनो, दिवाळीआधी PM किसानचा २१वा हप्ता येणार का? वाचा कधी जमा होणार पैसे?
15
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
16
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
17
लोकप्रिय 'दामिनी' मालिका पुन्हा येतेय प्रेक्षकांच्या भेटीला, ही अभिनेत्री मुख्य भूमिकेत, या चॅनेलवर होणार प्रसारण
18
चालकाचं नियंत्रण सुटलं अन् कार थेट उड्डाणपुलावरून खाली रेल्वे रुळावर पडली!
19
निम्न तेरणा प्रकल्पातून ७६३६ क्युसेक पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
20
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?

कोल्हापूर जिल्ह्याला तिसऱ्या दिवशीही परतीच्या पावसाने झोडपले, पिकांचे नुकसान

By संदीप आडनाईक | Updated: September 24, 2024 18:36 IST

गगनबावड्यात सर्वाधिक पाऊस

कोल्हापूर : जिल्ह्यात आज, मंगळवारी दिवसभर अनेक ठिकाणी परतीचा जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे हवेत काहीसा गारवा तयार झाला असला तरी अनेक ठिकाणी काढणी केलेल्या पिकांच्या नुकसानीस कारणीभूत ठरत आहे. कोल्हापूर जिल्ह्यात सरासरी ७.१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. गगनबावड्यात सर्वाधिक १८.४ मिलिमीटर तर भुदरगड तालुक्यात त्या खालोखाल १३.८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.जिल्ह्यात सलग दोन दिवस झालेल्या पावसामुळे पिकांना फटका बसला आहे. पुढील तीन आठवडे अर्थातच १० ऑक्टोबरपर्यंत राज्यात पावसाची शक्यता असून, राज्यात परतीचा पाऊस यंदा फारच बरसण्याची शक्यता आहे.अतिवायव्य राजस्थान आणि कच्छ परिसरातून वायव्य वारा, खालावणारी आर्द्रता आणि इतर काही वातावरणीय बदल यामुळे राज्यात सर्वत्र पावसाने जोर पकडलेला आहे. घाटमाथ्यावरही मंगळवारी परतीच्या पावसाने जोरदार झोडपले. कोल्हापूर जिल्ह्यात गगनबावडा तालुक्यात १८.४ पावसाची नोंद झाली आहे. भुदगरड, राधानगरी, करवीर, शाहूवाडी, पन्हाळा, हातकणंगले, शिरोळ, तसेच गडहिंग्लज, चंदगड आणि आजरा तालुक्यांतही जोरदार पाऊस झाला. जिल्ह्यातील ११ धरण क्षेत्रांत पावसाने मंगळवारी जोरदार हजेरी लावली.

दुसऱ्या आवर्तनातील पावसाची ही सुरुवात असल्याने जिल्ह्यातील बहुतांशी भागात पावसाने हजेरी लावली. सकाळपासून रात्रीपर्यंत काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी तुरळक स्वरूपात पाऊस झाला. कोल्हापूर जिल्ह्याच्या पश्चिम भागात दमदार पाऊस झाला. इचलकरंजीसह हातकणंगले तालुक्यात अनेक ठिकाणी तासभर पावसाने झोडपून काढले. त्यामुळे परिसर जलमय झाला. या पावसामुळे शेती मशागती आणि खरीप पीक काढणी कामाचा उरक शेतकऱ्यांनी वाढवला आहे.

शहरात पाणीच पाणी; नागरिकांची तारांबळकोल्हापूर शहर आणि उपनगरात पावसाने जोरदार हजेरी लावल्यामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले हाेते. यामुळे ठिकठिकाणी पाणी साचले होते. या पावसामुळे नागरिकांसह वाहनधारकांची मोठी तारांबळ उडाली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरRainपाऊस