शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
2
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
3
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
6
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
7
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
8
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
9
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
10
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
11
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
12
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
13
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
14
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
15
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
16
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
17
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
18
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
19
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
20
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!

पाऊस परतला, मळणीसह प्रचारावरही पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2019 13:08 IST

पाच-सहा दिवसांच्या विश्रांतीनंतर वादळी पावसाने बुधवारी कोल्हापूरला झोडपून काढले. दुपारपासून गडगडाटासह जोरदार आलेल्या पावसाच्या सरींनी शेतशिवारांसह निवडणुकीच्या प्रचारमंडपांतही धांदल उडवून दिली. मळणीसह प्रचारावरही पूर्णपणे पाणी फिरविले. दरम्यान, रविवार (दि. २०) पर्यंत वादळी पावसाचा तडाखा कायम राहील, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविल्याने तर सर्वच जण चिंतेत आहेत.

ठळक मुद्देपाऊस परतला, मळणीसह प्रचारावरही पाणीपावसाच्या सरींनी शेतशिवारांसह निवडणुकीच्या प्रचारमंडपांतही धांदल

कोल्हापूर : पाच-सहा दिवसांच्या विश्रांतीनंतर वादळी पावसाने बुधवारी कोल्हापूरला झोडपून काढले. दुपारपासून गडगडाटासह जोरदार आलेल्या पावसाच्या सरींनी शेतशिवारांसह निवडणुकीच्या प्रचारमंडपांतही धांदल उडवून दिली. मळणीसह प्रचारावरही पूर्णपणे पाणी फिरविले. दरम्यान, रविवार (दि. २०) पर्यंत वादळी पावसाचा तडाखा कायम राहील, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविल्याने तर सर्वच जण चिंतेत आहेत.गेल्या पंधरवड्यात परतीच्या पावसाने जिल्ह्यात अक्षरश: धुमाकूळ घातला. पूर्ण दसरा पावसातच गेल्यानंतर गेल्या पाच-सहा दिवसांपासून लख्ख सूर्यप्रकाश पडल्याने सर्वांनीच सुटकेचा नि:श्वास सोडला होता.

कडक ऊन पडल्याने भुईमूग, सोयाबीनसह भातकापणी व मळणी जोरात सुरू होती. याचवेळी २१ रोजी होणाऱ्या मतदानासाठीचा प्रचार १९ ला सायंकाळी संपणार असल्याने अवघे चारच दिवस हातात राहिल्याने प्रचार टिपेला पोहोचला आहे. प्रचाराचा अंतिम टप्प्यात एकेक तास महत्त्वाचा असल्याने गावागावांत, गल्लोगल्ली एकच धुरळा उडाला आहे.ही सर्व धांदल सुरू असतानाच दुपारपासून अचानक पाऊस सुरू झाल्याने सभांचे नियोजनच विस्कटून गेले. सकाळपासून तसे वातावरण दिसत होते; पण त्यानंतर ते निवळले होते. दुपारी अचानक पावसाचे आगमन झाले.

तीन-साडेतीनच्या सुमारास जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी तुफानी पाऊस कोसळला. संध्याकाळी पाचनंतर पुन्हा आभाळ भरून आले. ढगांच्या गडगडाटासह आणि विजेच्या लखलखाटासह पावसाने पुन्हा हजेरी लावल्याने संध्याकाळी होणाऱ्या सभा व प्रचारफेऱ्यांचे नियोजनच विस्कटले.पाऊस नसल्यामुळे रेनकोट, छत्र्या घरीच राहिल्याने संध्याकाळी भिजतच घर गाठण्याची वेळ नोकरदारांवर आली. त्यातच आता दिवाळीची खरेदीही सुरू असल्याने बाजारपेठेवरही याचा परिणाम झाला. पाऊस जोरात असल्याने अर्ध्या तासातच रस्त्यांना तळ्याचे स्वरूप आले. घाण पाण्यातूनच वाट काढत प्रवास करावा लागला. जयंती नाल्यातही पाण्याचा प्रवाह वाढल्याने वाहतूक पोलीस शाखेच्या कार्यालयामागे नाला ओसंडून वाहू लागला. 

 

टॅग्स :Rainपाऊसkolhapurकोल्हापूर