शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: शिरोळ तालुक्याला वळीव पावसाने झोडपले, उष्म्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2024 17:04 IST

सांगली-कोल्हापूर महामार्गावर झाडे कोसळल्याने वाहतूक ठप्प

जयसिंगपूर/ शिरोळ/ कुरुंदवाड : जयसिंगपूर, शिरोळसह तालुक्यात बुधवारी सायंकाळी गारपीट व वादळी वाऱ्यासह जोरदार वळीव पावसाने हजेरी लावली. सांगली- कोल्हापूर महामार्गावर उदगाव ते रेल्वे ब्रिजपर्यंत झाडे उन्मळून पडल्याने वाहतूक ठप्प झाली होती.उदगावसह परिसरात घरावरील पत्रे उडाल्याने नुकसान झाले, तर वीटभट्टी व्यावसायिकांनाही पावसाचा फटका बसला. सुमारे तासभर जोरदार पावसामुळे शेतकरी वर्गाला मात्र दिलासा मिळाला आहे. दोन तास वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता. कुरुंदवाड येथे एसटी आगारातील मोठे झाड डिझेल पंपानजीक असणाऱ्या शेडवर पडल्याने नुकसान झाले.बुधवारी दिवसभर वातावरणात प्रचंड उष्मा जाणवत होता. सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास अचानक पावसाला सुरुवात झाली. वाऱ्यामुळे काही ठिकाणी झाडे उन्मळून पडली. वीजपुरवठादेखील खंडित करण्यात आला होता. ४ वाजेच्या सुमारास सुमारे पंधरा मिनिटे पाऊस झाला. त्यानंतर पुन्हा ४:४५ वाजेनंतर गारपिटीसह पावसाला सुरुवात झाली. दरम्यान, शिरोळ येथील मुख्य मार्गावर पडलेल्या पावसामुळे दुचाकी घसरून पडण्याचे प्रकार घडले. शिरोळ येथे आठवडी बाजारात व्यापारी व भाजी विक्रेत्यांबरोबर नागरिकांची मोठी तारांबळ उडाली. उदगाव येथे झाडे पडल्यामुळे वाहतूक ठप्प झाली होती. त्यामुळे बसेसदेखील थांबविण्यात आल्या होत्या. त्यामुळे प्रवाशांची तारांबळ उडाली. दरम्यान, उदगाव येथे सांगली- कोल्हापूर महामार्गावर वाहतूक ठप्प झाल्याने वाहनांच्या दुतर्फा रांगा लागलेल्या होत्या.घटनास्थळी पोलिस निरीक्षक सत्यवान हाके यांच्यासह कर्मचाऱ्यांनी वाहतूक सुरळीत केली. वीटभट्टी व्यावसायिकांना या पावसाचा आर्थिक फटका बसला. या पावसामुळे शेतकरी वर्ग सुखावला आहे. कुरुंदवाड, दत्तवाड, हेरवाड, चिंचवाडसह परिसरातही चांगला पाऊस झाला.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरRainपाऊसTemperatureतापमान