शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur- आजरा परिसराला विजेच्या कडकडाटासह वळीवाने झोडपले, वीज पडून महिला जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2023 16:43 IST

व्यापाऱ्यांसह नागरिकांची उडाली तारांबळ

सदाशिव मोरेआजरा : जोरदार वारे व विजेच्या कडकडाटासह वळीवाच्या पावसाने आजरा परिसराला झोडपून काढले. आजऱ्याच्या आठवडा बाजार दिवशी मुसळधार पाऊस झाल्याने व्यापाऱ्यांसह नागरिकांची तारांबळ उडाली. हत्तिवडे येथे वीज पडून वीटभट्टीवर काम करणारी एक महिला जखमी झाली. अनसाबाई श्रीकांत चव्हाण (वय ३६, मुळगाव अलिबाद, जि. विजापूर कर्नाटक) असे जखमी महिलेचे नाव आहे.दुपारी तीनच्या सुमारास वादळी वाऱ्यासह विजेचा कडकडाट व मुसळधार पावसाला सुरुवात झाली. पावसाने आजर्‍याचा आठवडा बाजार ही दुपारीच संपला. वाऱ्यामुळे पिकलेल्या काजूसह ओला काजू व मोहोरही पडला आहे. पावसाच्या पाण्याने रस्त्यावर पाणीच पाणी झाले. अचानक आलेल्या पावसाने हत्तिवडे, होनेवाडी,  सुलगाव, चांदेवाडी येथील वीट भट्टी व्यवसायिकांचेही नुकसान झाले. भट्टीच्या ठिकाणी सर्वत्र पाणी तुंबले होते. मलिग्रे, गवसे व  मसोली परिसरात मोठा पाऊस  झाला. हा वळीवाचा पाऊस शेतीच्या मशागतीला उपयुक्त ठरणार आहे. पावसानंतर हवेत गारवा जाणवत होता.हत्तिवडे येथील कृष्णा हरेर यांच्या वीट भट्टीवर काम करणाऱ्या अनसाबाई चव्हाण यांच्या अंगावर विजेच्या ज्वाला पडल्याने मान व चेहरा भाजला. पडलेली वीज प्रथम वीज वितरणच्या तारेवर पडून त्याच्या खाली काम करणाऱ्या अनसाबाई या महिलेला ज्वाला भाजल्या आहेत. जखमी अनसाबाई यांच्यावर आजरा येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत अशी माहिती माजी सरपंच सुहास जोंधळे यांनी दिली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरRainपाऊस