शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंचा राजीनामा स्वीकारला; सदनिका घोटाळ्यात अटक वॉरंट निघताच आधी खाती काढून घेतली अन् आता…
2
कोणाशी युती, कोणाला उमेदवारी; काँग्रेसचा निर्णय २५ डिसेंबरला, आघाडीबरोबरच निधीची व्यवस्थाही स्थानिक पातळीवरच 
3
'व्हीबी-जी राम जी' विधेयक लोकसभेत मंजूर; विरोधकांनी विधेयकाचे कागद फाडून भिरकावले
4
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
5
भाडे थकविणाऱ्यांची विक्रीची घरे जप्त करू; हायकोर्टाची पुनर्वसन योजनेतील विकासकांना तंबी
6
किडनी विक्री प्रकरणी कंबोडियाच्या लिंकसह प्रत्येक व्यवहार तपासणार; तांत्रिक तपासातून उघड होणार 'इंटरनॅशनल लिंक'
7
दगडातून इतिहास साकारणारे शिल्पकार राम सुतार कालवश; वयाच्या १०१ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
१५ हजार एचआयव्ही रुग्णांनी अर्धवट सोडले उपचार; सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेसाठी गंभीर इशारा
9
विजयासाठी पैठणी, नथींचे देताहेत वाण : लकी ड्रॉमध्ये टीव्ही, फ्रिज अन् एसी सुद्धा...
10
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
11
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
12
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
13
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
14
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
15
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
16
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
17
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
18
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
19
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
20
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यावर पुन्हा पावसाचे ढग, बोचऱ्या वाऱ्याने हुडहुडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2019 15:00 IST

कोल्हापूर : दिवाळीपासूनच्या दोन-तीन दिवसांच्या विश्रांतीनंतर जिल्ह्यात पुन्हा एकदा पावसाळी ढगांची दाटी झाली आहे. शुक्रवारी पहाटे हलक्या सरी कोसळल्या. ...

ठळक मुद्देजिल्ह्यावर पुन्हा पावसाचे ढग, बोचऱ्या वाऱ्याने हुडहुडीकेरळ किनारपट्टीलगतच्या वादळाचा परिणाम 

कोल्हापूर : दिवाळीपासूनच्या दोन-तीन दिवसांच्या विश्रांतीनंतर जिल्ह्यात पुन्हा एकदा पावसाळी ढगांची दाटी झाली आहे. शुक्रवारी पहाटे हलक्या सरी कोसळल्या. सकाळी वातावरण निवळले; पण दुपारनंतर पुन्हा आभाळ भरून आले. बोचऱ्या वाऱ्यामुळे अक्षरश: सर्वांनाच हुडहुडी भरली आहे.केरळ किनारपट्टीवरील ‘क्यार’ चक्रीवादळ ओमानकडे सरकल्याने दिवाळीत पाऊस थांबला. हे वादळ शमते नाही तोवर ‘महा’ हे चक्रीवादळ पश्चिम किनारपट्टीवर धडकले आहे. परिणामी कर्नाटक, गोवा, कोकणसह महाराष्ट्रातही पुन्हा पावसाळा सुरू झाला आहे.

शुक्रवारी पहाटे तीनच्या सुमारास तासभर पाऊस बरसला. सकाळपासून वातावरण निवळल्याने दुपारपर्यंत कमालीचा उष्मा जाणवत होता. संध्याकाळी तर आभाळ एवढे दाटून आले की पाऊस कधीही कोसळेल, असेच वातावरण होते.दिवाळी झाली की हिवाळ्यातील थंडीचे आगमन होते; पण यावर्षी दिवाळी संपली तरी अजून पावसाळा सुरूच असल्याने गुलाबीऐवजी वादळी पावसाच्या बोचऱ्या थंडीने अंग गारठण्याची वेळ कोल्हापूरकरांवर आली आहे. वारे वाहत असल्याने हुडहुडी भरत आहे.विजांच्या कडकडाटांसह पावसाचा अंदाजगोवा, कोकणसह संपूर्ण महाराष्ट्रात विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह जोरदार पाऊस पडेल, असा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तविला आहे. सोसाट्याचा वारा वाहील, असाही इशारा दिला आहे. याशिवाय पुढील तीन दिवस तुरळक पावसाची हजेरी कायम राहील, असाही हवामानाचा अंदाज वर्तविला आहे.गुरुवार (७ नोव्हेंबर) पर्यंतचा हवामान अंदाजरविवार : अंशत: ढगाळ आणि तुरळक पाऊससोमवार : अंशत: ढगाळ, अत्यल्प पाऊसमंगळवार : अत्यल्प पाऊसबुधवार : मेघगर्जनेसह जोरदार पाऊसगुरुवार : मेघगर्जनेसह हलका पाऊसपिके वाचविण्याची धडपडगेल्या आठवड्यात घोंगावणारे ‘क्यार’ चक्रीवादळ पुढे सरकल्याने शेतकऱ्यांनी सुटकेचा निश्वास सोडत काढणी, मळणीच्या कामास सुरुवात केली होती; पण हा आनंद काही फार दिवस टिकला नाही. दोन-तीन दिवसांत पुन्हा पावसाचे आगमन झाल्याने आणि तीव्रता वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविल्याने शेतकऱ्यांच्या पायाखालची वाळूच सरकली आहे. हाता-तोंडाशी आलेले पीक पावसापासून वाचविण्यासाठी धडपड सुरू झाली आहे. 

 

टॅग्स :Rainपाऊसkolhapurकोल्हापूर