शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापुरात पुन्हा पावसाच्या सरी बरसल्या; पुढील चार दिवस पाऊस, बळीराजा सुखावला 

By भीमगोंड देसाई | Updated: August 16, 2023 19:32 IST

माळरानावरील ज्वारी, भुईमूग, सोयाबीन अशी पिके वाळत होती

कोल्हापूर : शहर, परिसर आणि जिल्ह्यात ठिकठिकाणी बुधवारी दुपारनंतर पावसाला पुन्हा प्रारंभ झाला. आठ दिवसांहून अधिक काळ गायब झालेल्या पावसाचे पुन्हा आगमन झाल्याने बळीराजा सुखावला आहे. हवेत गारवा निर्माण झाला. शहरातील सखल भागातील रस्त्यावर पाणी तुंबून राहिले.तब्बल आठवड्याहून अधिक दिवस पावसाने पाठ फिरवली होती. यामुळे नदी, ओढ्यातील पाणी कमी झाले. माळरानावरील ज्वारी, भुईमूग, सोयाबीन अशी पिके वाळत होती. पाऊस नसल्याने सर्वच पिकांची वाढ खुंटली होती. गडहिंग्लज, शिरोळ, हातकणंगले या तालुक्यात इतर ठिकाणी दुपारच्यावेळी उन्हाळ्यासारखे ऊन पडत होते. हवेत कमालीची उष्णता वाढली होती. अंगाची लाहीलाही होत होती. यामुळे शेतकऱ्यांसह साऱ्यांनाच पावसाची प्रतीक्षा लागून राहिली होती.आकाशात ढग जमत होते. पण पाऊस कोसळत नव्हता. बुधवारी पहाटेपासून आकाशात ढगांची गर्दी राहिली. सकाळी साडेदहाच्या सुमारास कागल, पन्हाळा, शाहूवाडी, चंदगड तालुक्यातील काही भागात हलका पाऊस झाला. शहरात आणि परिसरात दुपारी अडीचच्या सुमारास जोरदार पावसाला सुरुवात झाली. अचानक जोरदार पाऊस सुरू झाल्याने पादचारी, दुचाकी, फेरीवाले, विक्रेत्यांची तारांबळ उडाली. अर्धा तास जोरदार पाऊस पडला. त्यानंतर काही प्रमाणात पाऊस कमी झाला. मात्र अधून-मधून पावसाच्या सरी कोसळत राहिल्या.२२ पर्यंत पाऊस२० ऑगस्टपर्यंत चांगला पाऊस होईल. त्यानंतर २१ आणि २२ ऑगस्टपर्यंत पावसाच्या हलक्या सरी कोसळतील, अशी शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरRainपाऊसFarmerशेतकरी