रेल्वे तिकिटांचे ब्लॅक; दोघांना अटक
By Admin | Updated: May 10, 2014 00:13 IST2014-05-10T00:13:39+5:302014-05-10T00:13:39+5:30
कोल्हापूर : रेल्वेच्या तिकिटांचा काळाबाजार करणार्या गणेश आप्पासाो पोवार (वय २० रा. रुकडी ता. हातकणंगले) व राजेंद्र रावसाो दरिबे (वय २९ रा. इचलकरंजी)

रेल्वे तिकिटांचे ब्लॅक; दोघांना अटक
कोल्हापूर : रेल्वेच्या तिकिटांचा काळाबाजार करणार्या गणेश आप्पासाो पोवार (वय २० रा. रुकडी ता. हातकणंगले) व राजेंद्र रावसाो दरिबे (वय २९ रा. इचलकरंजी) या दोघांना रेल्वेच्या पुणे येथील गुन्हे शाखेच्या पोलिसांनी शुक्रवारी (दि.९) कोल्हापुरातील राजर्षी छत्रपती शाहू महाराज टर्मिनस येथे सायंकाळी पकडले. दोघांकडून रेल्वेची सहा तिकिटे जप्त केली. दरम्यान, काल (गुरुवारी) मिरज येथे रेल्वे सुरक्षा दलाच्या पथकाने इचलकरंजीमधील आशिष विजय रावळ (वय २३) या एजंटाला अटक केली होती. ही घटना ताजी असताना कोल्हापुरात दोघांना तिकिटाचा काळाबाजार करणार्या दोघांना अटक केले. अटक केलेल्या तिघांपैकी दोघेजण इचलकरंजीतील आहेत.