शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनानंतर रेल्वे सुरू, पण ज्येष्ठासह एकूण २२ प्रकारच्या सवलती अद्याप बंदच

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2022 13:42 IST

प्रवासी संघटनांनी वारंवार मागणी करूनदेखील रेल्वे प्रशासनाकडे याकडे लक्ष दिलेले नाही.

कोल्हापूर : कोरोनाचा प्रकोप कमी होऊन निर्बंध शिथिल होत असताना थांबलेल्या रेल्वेही आता हळूहळू धावू लागल्या आहेत; पण रेल्वेकडून प्रवाशांना तिकिटातून मिळणाऱ्या सवलती मात्र अजूनही यार्डातच आहेत. ज्येष्ठासह एकूण २२ प्रकारच्या सवलती अद्याप बंदच असल्याने पूर्ण तिकीट काढूनच प्रवास करावा लागत आहे. प्रवासी संघटनांनी वारंवार मागणी करूनदेखील रेल्वे प्रशासनाकडे याकडे लक्ष दिलेले नाही.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मार्च २०२०मध्ये पहिला लॉकडाऊन जाहीर झाल्यापासून केंद्र सरकारने रेल्वे बंद केल्या. कोरोनाची दुसरी लाट संपल्यानंतर रेल्वे काही प्रमाणात सुरू झाल्या; पण तिसऱ्या लाटेत पुन्हा यावर निर्बंध आले. एकेका मार्गावरच्या निम्म्यापेक्षा जास्त रेल्वे बंदच ठेवण्यात आल्या; पण ज्या काही रेल्वे नियम पाळून चालू आहेत. तेथे मात्र कोरोना येण्यापूर्वी ज्या काही सवलती दिल्या जात होत्या, त्या मात्र पूर्ववत करण्यात आल्या नाहीत.एवढी मिळते सवलत

रेल्वेकडून ज्येष्ठ नागरिकांसाठी तिकीट दरात ३३ टक्के सवलत दिली जाते. त्याचा चांगला लाभ होता; पण आता ते दिलेच जात नसल्याने ज्येष्ठांना पूर्ण तिकिटाचा भुर्दंड सोसावा लागत आहे.विशेष रेल्वेचा दर्जा असल्याने सवलत बंदच

कोरोनाची लाट ओसरल्यानंतर रेल्वे सुरू झाल्या आहेत. कोल्हापुरातून आजच्या घडीला कोल्हापूर ते सातारा ही एक पॅसेंजर व इतर सहा विशेष रेल्वे गाड्या धावत आहेत. कोल्हापुरातून सुटणाऱ्या तिरुपती, महालक्ष्मी, कोयना, धनबाद, गोंदिया, नागपूर, दिल्ली या रेल्वेमध्ये सवलत होत्या; पण या गाड्या आता धावू लागल्या तरी सवलत बंदच आहे.

ज्येष्ठांना फटका

आधीच आमचे वय झाले आहे, उत्पन्नाचे मार्ग कमी झाले आहेत, रेल्वेचा प्रवास इतर वाहनाच्या तुलनेत स्वस्त आणि सवलती मिळत असल्याने याला आम्ही प्राधान्य देतो; पण आता ही सवलत मिळणेच बंद असल्याने आम्हाला प्रवास करताना अधिकचा खर्च करावा लागत आहे. - सखाराम पाटील, जरगनगर

कोल्हापुरातून सुटणाऱ्या रेल्वे गाड्या पूर्ववत करण्याबाबत रेल्वे प्रशासनाची भूमिका ढिम्म असल्याने आधीच प्रवाशांमधून संताप आहे, आता ज्या काही सहा गाड्या सुरू आहेत, त्यात सवलत नाकारून रेल्वेने प्रवाशांच्या जखमेवर मीठ चोळले जात आहे. आम्ही वारंवार पत्र पाठवून पाठपुरावा करत आहोत; पण दुर्लक्ष केले जात आहे. -शिवनाथ बियाणी, रेल्वे प्रवासी संघटना

टॅग्स :kolhapurकोल्हापूरrailwayरेल्वेcorona virusकोरोना वायरस बातम्या