शहरं
Join us  
Trending Stories
1
"गाडी चढी आप पे, पैसे मेरे बाप पे..."; पुणे अपघातातील आरोपीचा कथित व्हिडिओ व्हायरल, नेटकरी खवळले
2
डोंबिवली एमआयडीसी स्फोट: मृतांचा आकडा वाढला; ६ जणांनी गमावले प्राण, ४८ जखमींवर उपचार सुरू
3
गजानन कीर्तीकर यांच्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिले असे संकेत  
4
"पतीच्या डोळ्यातून रक्त अन्...", दहशतवाद्यांच्या हल्ल्याला सामोरी गेलेल्या महिलेची थरारक कहाणी!
5
छत्तीसगच्या दंतेवाडामध्ये भीषण चकमक; सुरक्षा दलांनी 7 नक्षलवाद्यांना घातले कंठस्नान
6
संशयातून हसतं-खेळतं कुटुंब उद्ध्वस्त; खिशातून पैसे चोरण्याच्या आरोपात पतीने केली पत्नीची हत्या
7
ॲमेझॉनच्या कर्मचाऱ्याचा कारनामा, कंपनी सोडणाऱ्यांच्या खात्यांमधून काढले कोट्यवधी रुपये, अखेर असा सापडला जाळ्यात
8
"पुण्यातील कार अपघाताची न्यायालयीन चौकशी करून दोषींना कठोर शिक्षा द्या’’ काँग्रेसची मागणी   
9
"स्वत:च्या मर्यादा पाळा, घुसखोरी करायचा प्रयत्न केलात तर..."; तैवानने चीनला भरला सज्जड दम
10
स्फोटामुळं डोंबिवली हादरली! इमारतीच्या काचा फुटल्या, ३ किमी परिसर दहशतीत
11
"डोंबिवलीतील अतिधोकादायक रासायनिक कंपन्यांचे कायमस्वरूपी स्थलांतर करणार"
12
शाहरुखची मॅनेजर पूजा ददलानीचं ट्वीट, किंग खानच्या तब्येतीविषयी दिली महत्वाची अपडेट
13
रोहित पवारांचे नीरव मोदी कनेक्शन?; कर्जत MIDC प्रकरणावरून अजित पवार गटाचा गंभीर आरोप
14
"विभवने कुणाच्या सांगण्यावरून मारहाण केली?’’, संपूर्ण घटनाक्रम सांगत स्वाती मालिवाल यांचा सवाल   
15
IPL 2024 चे दोन सामने उरले! दिग्गज ब्रेट लीने जाहीर केले फायनलिस्ट अन् 'चॅम्पियन'
16
बिल्डरचा मुलगा, राष्ट्रवादी नेत्याचा पोरगा! अखेर जळगावच्या 'हिट अँड रन' प्रकरणात पोलिसांची कारवाई
17
अपचनाच्या त्रासापासून आता होईल सुटका; जेवताना 'ही' 3 पथ्यं नक्की पाळा
18
"माझ्या संयमाची आणखी परीक्षा घेऊ नका, लवकरात लवकर ..." एचडी देवेगौडांचा प्रज्वल रेवण्णा यांना इशारा
19
ना गळ्यात 'भाजपा'चा गमछा, ना भाषणात मोदींचा उल्लेख... Maneka Gandhi यांच्या प्रचारसभेत दिसला Varun Gandhi यांच्यातील बदल
20
Narendra Modi : "काँग्रेसचं सरकार 7 जन्मात येणार नाही; गाय दूध देत नाही तोवर तूप खाण्यासाठी..."

दुहेरीकरणामुळे गुरुवारपर्यंत रेल्वेचा मेगा ब्लॉक, पुणे, कोयना एक्स्प्रेस रद्द; जाणून घ्या बदलले वेळापत्रक

By संदीप आडनाईक | Published: February 17, 2024 12:53 PM

कोल्हापूर : मध्य रेल्वे पुणे विभागातील पुणे-मिरज रेल्वेमार्गावर तारगाव-मसूर-शिरवडे सेक्शनमध्ये रेल्वे ट्रॅकचे दुहेरीकरण आणि विविध अभियांत्रिकी, सिग्नलिंग दूरसंचार कामांसाठी ...

कोल्हापूर : मध्य रेल्वे पुणे विभागातील पुणे-मिरज रेल्वेमार्गावर तारगाव-मसूर-शिरवडे सेक्शनमध्ये रेल्वे ट्रॅकचे दुहेरीकरण आणि विविध अभियांत्रिकी, सिग्नलिंग दूरसंचार कामांसाठी गुरुवार, दि. २२ फेब्रुवारीपर्यंत ट्रॅफिक ब्लॉक घेण्यात आला आहे. त्यामुळे कोल्हापूरच्या प्रवाशांनी लक्ष द्यावे. काही गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम होणार, तर काही गाड्या रद्द झाल्या आहेत. दुहेरीकरण, पायाभूत सुविधांची देखभाल आणि सुरक्षिततेसाठी हा ब्लॉक घेण्यात आल्यामुळे मध्य रेल्वेने प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन केले आहे.पुणे एक्स्प्रेस, कोयना रद्ददि. २० फेब्रुवारी रोजी कोल्हापूर-पुणे, तर २१ फेब्रुवारी रोजी कोल्हापूर-पुणे आणि पुणे-कोल्हापूर एक्स्प्रेस रद्द केली आहे. याशिवाय २२ फेब्रुवारी रोजी कोल्हापूर-मुंबई आणि मुंबई-कोल्हापूर मार्गांवर धावणारी कोयना एक्स्प्रेस रद्द केली आहे. २३ फेब्रुवारी रोजीची पुणे-कोल्हापूर एक्स्प्रेसही रद्द केली आहे.बुधवार, गुरुवारी या गाड्यांचे बदलले वेळापत्रकयानिमित्ताने २१ आणि २२ फेब्रुवारी रोजी काही रेल्वे शॉर्ट टर्मिनेशन आणि शॉर्ट ओरिजिनेशन केले आहे. यामध्ये कोल्हापूर-सातारा डेमू गाडीचा प्रवास कऱ्हाड येथे संपणार आहे. ही गाडी या दोन दिवशी कऱ्हाड-सातारा दरम्यान रद्द केली आहे. सातारा-कोल्हापूर मार्गावरील ही डेमू गाडीही या दोन दिवसांत कऱ्हाड येथून सुटेल; म्हणजेच ही गाडी सातारा-कऱ्हाडदरम्यान रद्द राहील. याशिवाय पुणे-कोल्हापूर एक्स्प्रेसचा प्रवास सातारा येथे संपेल; म्हणजेच ही गाडी सातारा-कोल्हापूरदरम्यान रद्द केली आहे. कोल्हापूर-पुणे एक्स्प्रेस सातारा येथून पुण्याकरिता सोडण्यात येईल म्हणजेच ही गाडी कोल्हापूर-सातारादरम्यान रद्द राहील. २१ फेब्रुवारी रोजी गोंदिया येथून सुटणारी गाडी गोंदिया-कोल्हापूर महाराष्ट्र एक्स्प्रेसचा प्रवास पुण्यात संपेल; म्हणजेच ही गाडी पुणे-कोल्हापूरदरम्यान रद्द राहील. २२ फेब्रुवारी रोजी रोजी कोल्हापूर येथून सुटणारी कोल्हापूर-गोंदिया महाराष्ट्र एक्स्प्रेस पुणे येथून सुटेल म्हणजेच ही गाडी कोल्हापूर-पुणेदरम्यान रद्द राहील.

कोयना एक्स्प्रेस दोन तास उशिरा सुटणारदि. १७ आणि १८ फेब्रुवारी रोजी कोल्हापूरहून सुटणारी कोल्हापूर-मुंबई कोयना एक्स्प्रेस ही गाडी कोल्हापुरातून ८:१५ ऐवजी रात्री १०:१५ वाजता म्हणजेच दोन तास उशिराने सुटेल. याशिवाय दिनांक १९ फेब्रुवारी रोजी पुण्याहून सुटणारी पुणे-कोल्हापूर एक्स्प्रेस सेक्शनमध्ये एक तासासाठी रेग्युलेट केली आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरrailwayरेल्वे