जयसिंगपूर बाजार समितीच्या सभापतिपदी रायगोंडा पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2021 04:27 IST2021-01-19T04:27:02+5:302021-01-19T04:27:02+5:30

जयसिंगपूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतिपदी रायगोंडा पाटील (जांभळी), तर उपसभापतिपदी महमंदशफी पटेल (औरवाड) यांची बिनविरोध निवड ...

Raigonda Patil as the Chairman of Jaisingpur Market Committee | जयसिंगपूर बाजार समितीच्या सभापतिपदी रायगोंडा पाटील

जयसिंगपूर बाजार समितीच्या सभापतिपदी रायगोंडा पाटील

जयसिंगपूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतिपदी रायगोंडा पाटील (जांभळी), तर उपसभापतिपदी महमंदशफी पटेल (औरवाड) यांची बिनविरोध निवड करण्यात आली. अध्यक्षस्थानी सहायक निबंधक प्रेमदास राठोड होते.

येथील दे. भ. रत्नाप्पाण्णा कुंभार सभागृहात संचालक मंडळाच्या बैठकीत या निवडीसाठी सभा घेण्यात आली. सभापतिपदासाठी रायगोंडा पाटील यांचे नाव सुभाषसिंग रपजूत यांनी सुचविले. त्यास शैलेश कांबळे यांनी अनुमोदन दिले, तर उपसभापतिपदाकरिता महंमदशफी पटेल यांचे नाव विजयसिंह माने-देशमुख यांनी सुचविले. दरम्यान, पाटील व पटेल यांचे एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांच्या निवडी बिनविरोध झाल्याचे सहायक निबंधक राठोड यांनी जाहीर केले.

याप्रसंगी अशोक पाटील, बाबासो भोकरे, दत्ता गुरव, शैलेश कांबळे, आप्पासो भोसले, सुनीता हाळे, सुनीता भोकरे, राबिया विजापूरे, नालासाब दर्जी, संदीप पोवार, बाबगोंडा पाटील, धोंडिराम गायकवाड, शरद चौगुले, सुनील गावडे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. दरम्यान, आरोग्य राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्याहस्ते नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.

फोटो - १८०१२०२१-जेएवाय-०५

फोटो ओळ - जयसिंगपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा आरोग्य राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला.

Web Title: Raigonda Patil as the Chairman of Jaisingpur Market Committee