माणगाववाडी येथे हातभट्टी अड्ड्यावर छापे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2021 04:17 IST2021-06-19T04:17:53+5:302021-06-19T04:17:53+5:30
हातकणंगले तालुक्यासह कर्नाटक सीमाभाग आणि सांगली जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये कुप्रसिद्ध असलेल्या माणगाववाडी येथील गावठी हातभट्टी दारूनिर्मित अड्ड्यावर भल्या ...

माणगाववाडी येथे हातभट्टी अड्ड्यावर छापे
हातकणंगले तालुक्यासह कर्नाटक सीमाभाग आणि सांगली जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये कुप्रसिद्ध असलेल्या माणगाववाडी येथील गावठी हातभट्टी दारूनिर्मित अड्ड्यावर भल्या पहाटे राज्य उत्पादन शुल्क विभागाने हातकणंगले पोलिसाच्या मदतीने छापा टाकून ४ लाख ३८ हजार ७०० रुपयाचा माल जप्त केला. या कारवाईमध्ये दारूभट्टी मालक अमर अशोक खोत, बापू गणपती खोत, बाळासोा सखाराम खोत, तुकाराम व काकासाहेब कल्लू खोत (रा. माणगाववाडी) विरोधात गुन्हे दाखल झाले आहेत . कारवाई उत्पादन शुल्क आयुक्त कांतीलाल उमाप, वाय. एम. पोवार श्रीमती जयसिंग गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक पी. आर. पाटील, निरीक्षक एस. एस. बरगे, निरीक्षक मिलिंद गरुड, अतुल पाटील यांच्यासह हातकणंगले पोलीस ठाण्याच्या उपनिरीक्षक सीमा बडे यांनी सहभाग घेतला होता.
१८ हातकणंगले दारूअड्डा
फोटो = माणगाववाडी येथील गावठी हातभट्टी दारूभट्टीवर छापे मारून मुद्देमाल जप्त केले.