उजळाईवाडीत गावठी दारूअड्ड्यांवर छापे

By Admin | Updated: December 27, 2015 01:31 IST2015-12-27T01:09:40+5:302015-12-27T01:31:37+5:30

सातजणांना अटक : ग्रा. पं. सदस्याचा समावेश

Raids on brick-and-mortar brides | उजळाईवाडीत गावठी दारूअड्ड्यांवर छापे

उजळाईवाडीत गावठी दारूअड्ड्यांवर छापे

कोल्हापूर : गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील उजळाईवाडी येथील गावठी हातभट्टी दारूअड्ड्यांवर शनिवारी सकाळी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने छापा टाकून ग्रामपंचायत सदस्यांसह सातजणांना अटक केली. संशयित आरोपी ग्रामपंचायत सदस्य मोहन रामसिंग मछले (वय ४२), नितीन शशिकांत गागडे (२८), शागिर्द श्रीशांत तमायचे (३०), विष्णू सुरेश गुमाने (३०), कार्तिक अशोक गागडे (३५), गोपाळ बाळू अभंगे (५५), कृ ष्णा विष्णू गुमाने (३५) अशी त्यांची नावे आहेत. यावेळी हातभट्ट्या उद्ध्वस्त करून सुमारे पंचाहत्तर हजार किमतीचा मद्यसाठा जप्त केला.
‘थर्टी फर्स्ट’च्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील अवैध दारूअड्ड्यांवर छापे टाकण्याचे आदेश अप्पर पोलीस अधीक्षक चैतन्या एस. यांनी सर्व पोलीस ठाण्यांना दिले आहेत. त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी उजळाईवाडी येथील गावठी हातभट्ट्यांवर छापे टाकून सातजणांना अटक केली. येथील जमिनीच्या खाली पुरून ठेवलेले बॅरेल, हातभट्ट्या जेसीबीच्या साहाय्याने उद्ध्वस्त करून ७००
लिटर दारू, तीन हजार लिटर रसायन, ६० किलो गूळ, असा एकूण पंच्चाहत्तर हजार किमतीचा मद्यसाठा जप्त केला.
या कारवाईत पोलीस निरीक्षक दिनकर मोहिते, सहायक पोलीस निरीक्षक अनिल तनपुरे, विकास जाधव, रमेश खुणे, पोलीस उपनिरीक्षक गजेंद्र पालवे, सुशील वंजारी, सचिन पंडित, आदींसह कर्मचारी सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)

Web Title: Raids on brick-and-mortar brides