लक्षतीर्थ वसाहतीमध्ये तीनपानी जुगार अड्ड्यावर छापा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2021 04:30 IST2021-08-20T04:30:25+5:302021-08-20T04:30:25+5:30
कोल्हापूर : येथील लक्षतीर्थ वसाहतीमध्ये तीन पानी जुगार अड्ड्यावर लक्ष्मीपुरी पोलिसांनी छापा टाकून पाचजणांना अटक केली. त्यांच्याकडून ३८ हजारांहून ...

लक्षतीर्थ वसाहतीमध्ये तीनपानी जुगार अड्ड्यावर छापा
कोल्हापूर : येथील लक्षतीर्थ वसाहतीमध्ये तीन पानी जुगार अड्ड्यावर लक्ष्मीपुरी पोलिसांनी छापा टाकून पाचजणांना अटक केली. त्यांच्याकडून ३८ हजारांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त केला.
गुन्हा दाखल झालेल्यांची नावे अशी, अशोक किसन पाटील, राजेश महादेव पाटील (दोघेही रा. लक्षतीर्थ वसाहत), किरण अरुण तट, धीरज देवेंद्र जावळे (दोघे रा. संभाजीनगर), सुरेश लक्ष्मण कुराडे (रा. राजारामपुरी).
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, लक्षतीर्थ वसाहत येथील एका बंद खोलीत तीनपानी जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती लक्ष्मीपुरी पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी तेथे पाळत ठेवून छापा टाकला. छाप्यात संशयित पाचजणांना अटक करण्यात आली. त्याच्याकडून रोख १३६० रोकड, तीन मोबाईल संचांसह ३८ हजार ८३० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई पोलीस निरीक्षक अनिल गुजर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.