इचलकरंजीत राज कॅसल हॉटेलवर छापा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2021 04:25 IST2021-05-09T04:25:00+5:302021-05-09T04:25:00+5:30
इचलकरंजी : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू केलेल्या शासन निर्बंधांचे उल्लंघन करुन हॉटेल सुरु ठेवल्याप्रकरणी येथील राज कॅसल या रेस्टॉरंट व ...

इचलकरंजीत राज कॅसल हॉटेलवर छापा
इचलकरंजी : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू केलेल्या शासन निर्बंधांचे उल्लंघन करुन हॉटेल सुरु ठेवल्याप्रकरणी येथील राज कॅसल या रेस्टॉरंट व बारवर गावभाग पोलिसांनी छापा टाकला. या कारवाईत १५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून ४ लाख ४० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलीस काॅन्स्टेबल अमित दीपक कदम यांनी फिर्याद दिली आहे.
अधिक माहिती अशी, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या आदेशाचा भंग करत हॉटेल राज कॅसल येथे विदेशी दारूची विक्री करत ग्राहकांना हॉटेलात बसवून जेवण दिले जात असल्याची माहिती गावभाग ठाण्याचे प्रभारी निरीक्षक गजेंद्र लोहार यांना मिळाली होती. त्यानुसार शुक्रवारी रात्रीच्या सुमारास हॉटेलवर छापा टाकला. त्यावेळी तेथे काहीजण मद्यपान व जेवण करताना आढळून आले. या प्रकरणी पोलिसांनी हॉटेल मालकासह इजाज कलावंत, इम्रान कलावंत (दोघे रा. पाटील मळा), दीपक केर्ले (रा. नारायणमळा), मुबारक कलावंत (रा. टाकवडे वेस), फैय्याज मुल्ला (रा. पाटील मळा), तौफिक नेजकर (रा. विरशैव बँकेजवळ), मयूर महाद्वार (रा.विक्रमनगर), आकाश नाईक (रा. गणेशनगर), दीपक शेळके (रा. आयबी पेट्रोल पंपाजवळ), अनिलकुमार सरोज (रा. गणेशनगर), आकाश बडे (रा. जवाहरनगर), नागेश मधेला (रा. नारायण मळा) अशा १५ जणांवर गुन्हा दाखल केला आहे.