राशिवडेत मटका अड्ड्यावर छापा; सव्वादोन लाखांचा मुद्देमाल जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2020 04:35 IST2020-12-14T04:35:48+5:302020-12-14T04:35:48+5:30

राधानगरी पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, येथील बिरदेव मंदिरापाठीमागील संभाजी पोवार यांच्या बंद घरामध्ये कल्याण मटका घेत असल्याची माहिती मिळाल्यानंतर ...

Raid on Matka hideout in Rashiwade; Twelve lakh items confiscated | राशिवडेत मटका अड्ड्यावर छापा; सव्वादोन लाखांचा मुद्देमाल जप्त

राशिवडेत मटका अड्ड्यावर छापा; सव्वादोन लाखांचा मुद्देमाल जप्त

राधानगरी पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, येथील बिरदेव मंदिरापाठीमागील संभाजी पोवार यांच्या बंद घरामध्ये कल्याण मटका घेत असल्याची माहिती मिळाल्यानंतर एल.सी.बी.च्या ११ जणांच्या पथकाने छापा टाकला. यावेळी शेखर अप्पा पोवार, जवाहरनगर, हातकणंगले; अनिल पोवार, इचलकरंजी; सतीश मोरज, हुपरी; प्रवीण बावडेकर, इचलकरंजी; मिलिंद पोतदार, इचलकरंजी; प्रवीण खाटकी, इचलकरंजी; विलास पाटील, येळवडे; अनिल पाटील, चंद्रे; राजेंद्र दुधाणे, इचलकरंजी; संभाजी ढोणुक्षे, माद्याळ; सागर जोंग, राशिवडे यांना अटक करण्यात आली. त्याच्याकडून रोख रक्कम एक लाख १३ हजार ५२० रुपये रोख, नऊ मोबाईल, चार मोटारसायकली असा मिळून दोन लाख २५ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या कारवाईमध्ये पो. हे. काँ. उत्तम सडोलीकर, सागर कांडगावे यांच्यासह ११ कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला होता.

Web Title: Raid on Matka hideout in Rashiwade; Twelve lakh items confiscated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.