जयहिंद बारवर छापा; चौघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2021 04:25 IST2021-05-10T04:25:27+5:302021-05-10T04:25:27+5:30

बारमालक अल्लाबक्ष मौला बागवान (वय ४३, रा. जवाहरनगर), मॅनेजर सलीम बाबू मुजावर (४६), सुनील मारुती कडाले (४३) व गिरिधर ...

Raid on Jayhind Bar; Four arrested | जयहिंद बारवर छापा; चौघांना अटक

जयहिंद बारवर छापा; चौघांना अटक

बारमालक अल्लाबक्ष मौला बागवान (वय ४३, रा. जवाहरनगर), मॅनेजर सलीम बाबू मुजावर (४६), सुनील मारुती कडाले (४३) व गिरिधर रामचंद्र तंत्री (५५, दोघे रा. कोरोची) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, कोरोची परिसरामध्ये वॉटर एटीएम शुद्ध पेयजल प्रकल्प असून, त्याला लागूनच जयहिंद बार आहे. शासनाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बार बंद ठेवण्याचे आदेश दिले असतानाही त्याचा भंग करीत दारूविक्री सुरू होती. ही माहिती महामुनी यांच्या पथकाला समजली. तेथे तपासणी केली असता वॉटर एटीएमजवळ एका चौकोनी खिडकीतून दारूविक्री सुरू असल्याचे निदर्शनास आले. त्यानुसार पथकाने छापा टाकून मुद्देमालासह चौघांना ताब्यात घेतले. यावेळी शहापूरचे सहायक पोलीस निरीक्षक राजेंद्र यादव, गणेश खराडे व यांच्यासह पोलीस कर्मचारी उपस्थित होते.

Web Title: Raid on Jayhind Bar; Four arrested