कणेरीवाडीजवळ हुक्का बारवर छापा, सात जणांविरोधात गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:29 IST2021-09-12T04:29:23+5:302021-09-12T04:29:23+5:30

कणेरीवाडी (ता. करवीर) येथे पुणे-बंगलोर महामार्गालगत हॉटेल ९६ कोपामध्ये अवैधरीत्या सुरू असलेल्या हुक्का बारवर शुक्रवारी रात्री पोलिसांनी छापा ...

Raid on hookah bar near Kaneriwadi, crime against seven persons | कणेरीवाडीजवळ हुक्का बारवर छापा, सात जणांविरोधात गुन्हा

कणेरीवाडीजवळ हुक्का बारवर छापा, सात जणांविरोधात गुन्हा

कणेरीवाडी (ता. करवीर) येथे पुणे-बंगलोर महामार्गालगत हॉटेल ९६ कोपामध्ये अवैधरीत्या सुरू असलेल्या हुक्का बारवर शुक्रवारी रात्री पोलिसांनी छापा टाकला. या कारवाईत चार युवक, चालक, व्यवस्थापकासह सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण पाटील यांनी ही कारवाई केली.

यामध्ये रोहित राजकुमार मंचुडिया (वय वर्ष २७ रा. शाहूपुरी रेल्वे स्टेशन, कोल्हापूर), सनी रुपेश सलोजा (वय वर्षे २४ रा. ताराबाई पार्क, कोल्हापूर), सुधीर चंद्रलाल पोपटानी( वय वर्ष २५ रा. सिंधू मार्केट, गांधीनगर), अक्षय अशोक गिडवानी (वय वर्ष २५,रा. सिंधू मार्केट गांधी नगर ), सुरज शिवाजी शिंदे , (रा. मिरजकर तिकटी कोल्हापूर) सुशांत गंगाराम नलवडे (वय वर्षे २० रा. राजारामपुरी १४ वी गल्ली, कोल्हापूर ) व शुभम राजू पाटील वय वर्ष २२ रा. राजारामपुरी आठवी गल्ली, कोल्हापूर ) यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. कारवाईवेळी दहा लाखाहून अधिक किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. याबाबतची फिर्याद गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्यातील पोलीस नाईक पाटील यांनी दिली. अधिक तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल सावंत करीत आहेत.

Web Title: Raid on hookah bar near Kaneriwadi, crime against seven persons