वडगावात जुगारअड्ड्यावर छापा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2021 04:26 IST2021-05-20T04:26:01+5:302021-05-20T04:26:01+5:30
पेठवडगाव : येथील सुतार गल्लीत एका घरामध्ये सुरू असणाऱ्या जुगारअड्ड्यावर तीनपानी जुगार खेळताना ११ जणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून रोख ...

वडगावात जुगारअड्ड्यावर छापा
पेठवडगाव : येथील सुतार गल्लीत एका घरामध्ये सुरू असणाऱ्या जुगारअड्ड्यावर तीनपानी जुगार खेळताना ११ जणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून रोख रक्कम, जुगाराचे साहित्य, मोबाईल, दुचाकी असा सुमारे ४४ हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.
याप्रकरणी विजय संजय भोसले (वय २७), सागर सतीश नायकवडी (३२), संतोष श्रीकांत भोसले (४४), शिवराज संजय सुतार (३०), संजय तानाजी मोरे (३४), स्वप्निल कृष्णात सुतार (२५), भूपाल देवाप्पा गायकवाड (८५), संपत बाबूराव भोसले (६०), बाळासोा देवाप्पा गायकवाड (६५), धनाजी वसंत पाटील (४९), तानाजी शामराव नायकवडी (५८, सर्व रा. सुतारगल्ली, पेठवडगाव) अशी ताब्यात
घेण्यात आलेल्यांची नावे आहेत. याबाबत फिर्याद पोलीस शिपाई अशोक कृष्णा जाधव यांनी फिर्याद दिली.
पोलिसांनी सांगितले की, येथील सुतार गल्लीतील संजय तानाजी मोरे याच्या घरामध्ये जुगारअड्डा सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वाती सूर्यवंशी यांच्या पथकाने मंगळवारी तेथे रात्री आठ वाजता छापा टाकला. त्यावेळी ११ जणांना तीनपानी जुगार खेळताना पकडण्यात आले. रोख २ हजार ४१५ रुपये, तीन मोबाईल, मोटारसायकल असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तपास सहायक पोलीस निरीक्षक स्वाती सूर्यवंशी करत आहेत.