इचलकरंजीत जुगार अड्ड्यावर छापा; २७ जण अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 04:26 IST2021-09-26T04:26:38+5:302021-09-26T04:26:38+5:30
इचलकरंजी : येथील इंदिरानगर परिसरातील आवळे यांच्या शेडमध्ये विश्वविजय युवक मंडळाच्या नावाने सुरू असलेल्या तीनपानी जुगार अड्ड्यावर पोलिसांनी शुक्रवारी ...

इचलकरंजीत जुगार अड्ड्यावर छापा; २७ जण अटक
इचलकरंजी : येथील इंदिरानगर परिसरातील आवळे यांच्या शेडमध्ये विश्वविजय युवक मंडळाच्या नावाने सुरू असलेल्या तीनपानी जुगार अड्ड्यावर पोलिसांनी शुक्रवारी मध्यरात्रीच्यासुमारास छापा टाकून कारवाई केली. या कारवाईत २७ जणांना अटक केली. त्यांच्याकडून पोलिसांनी रोख ४७ हजार ६१० रुपये, २२ मोबाईल, १७ मोटारसायकली व जुगाराचे साहित्य असा एकूण दहा लाख ६३ हजार २१० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. जागा मालक अब्राहम आवळे (रा. आवळे गल्ली, इचलकरंजी) व चालक बाबासोा सीताराम पवार (रा. शिरदवाड, ता. शिरोळ) हे दोघे फरार झाले आहेत.
याबाबत पोलिसांतून मिळालेली माहिती, शहरातील इंदिरानगर परिसरात असलेल्या अब्राहम आवळे याच्या मालकीच्या शेडमध्ये विश्वविजय युवक मंडळाच्या नावाखाली अवैधपणे तीनपानी जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती पोलिसांनी मिळाली. त्यानुसार कोल्हापूर व इचलकरंजी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी शुक्रवारी मध्यरात्रीच्यासुमारास संयुक्तपणे या जुगार अड्ड्यावर छापा टाकून कारवाई केल्याची माहिती पोलीस निरीक्षक किरण भोसले यांनी दिली.
या कारवाईत इचलकरंजी, हातकणंगले, शिरोळ परिसरातील गौस महंमद सय्यद, विनय शामसुंदर दसरे, साहेबलाल मोहद्दीन मुजावर, इकबाल पापालाल शेख, विशाल आप्पासोा खोत, मलिक शाहू पाथरवट, प्रवीण रंगराव कटकुळे, राजू सुरेश कांबळे, सुरेश दत्तू पाटील, राजकुमार आण्णाप्पा पवार, वैभव सखाराम पाटील, मुदस्सर दस्तगीर कामत, सिकंदर आबालाल जमादार, अशोक ज्ञानदेव सुतार, विजय उध्दव डोईफोडे, प्रफुल्ल प्रकाश पाटील, सागर राजाराम गायकवाड, दत्तात्रय दिनकर ढाकरे, अरविंद रामखस गिरंगे, मेहबूब शरीफ मुल्ला, करमछले, संतोष सुरेश पाटील, बंडू तुकाराम बिलुगडे, बाबासोा सीताराम पोवार, विजय श्रीराम कांबळे, चंद्रकांत किसन भोसले, जगदीश प्रसाद जोशी या २७ जणांना अटक केली. याप्रकरणी गावभाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. अपर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड, पोलीस उपअधीक्षक बाबूराव महामुनी व कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमोद जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली इचलकरंजी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक किरण भोसले, पोलीस उपनिरीक्षक अंकुश कारंडे आदीच्या पथकाने केली.