शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
3
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
4
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
5
गुजरात पोलिसांची मोठी कावाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
6
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
7
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
8
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
9
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
10
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
11
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
12
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
13
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
14
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
15
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
16
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
17
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
18
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
19
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
20
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा

Kolhapur News: गर्भलिंग चाचणीतील रिपोर्ट कोडवर्डमध्ये, स्टिंग ऑपरेशननंतर धक्कादायक माहिती समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2023 17:28 IST

कोल्हापूर : गर्भलिंग निदान आणि गर्भपात करण्यावर कायदेशीररीत्या निर्बंध असले तरी, छुप्या पद्धतीने हे प्रकार सुरूच आहेत. यातून लाखो ...

कोल्हापूर : गर्भलिंग निदान आणि गर्भपात करण्यावर कायदेशीररीत्या निर्बंध असले तरी, छुप्या पद्धतीने हे प्रकार सुरूच आहेत. यातून लाखो रुपयांची उलाढाल होत असल्याचा प्रकार सोमवारी (दि. १२) राजारामपुरीतील श्री हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरमध्ये झालेल्या स्टिंग ऑपरेशनमधून समोर आला. इथे गर्भलिंग चाचणीसाठी १५ हजार रुपये तर, गर्भपातासाठी २० हजार रुपयांचा दर होता, अशी माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.सहा महिन्यांपूर्वीच राधानगरी आणि भुदरगड तालुक्यातील दोन रॅकेटचे कारनामे उघडकीस आल्यानंतर अवैध गर्भलिंग निदान करण्याचे प्रकार कमी होतील, अशी अपेक्षा होती. मात्र, शासकीय आरोग्य यंत्रणांची दिशाभूल करून बेकायदेशीर गर्भलिंग निदान करण्याचे प्रकार सुरूच आहेत. राजारामपुरीतील श्री हॉस्पिटलमध्ये तपासणीसाठी जाणाऱ्या तक्रारदार महिलेने दिलेल्या माहितीनुसार, त्यांना एक मुलगी आहे.आठ दिवसांपूर्वी नियमित तपासणीसाठी गेल्यानंतर हॉस्पिटलमधील जनसंपर्क अधिकाऱ्यांनी त्यांना गर्भलिंग निदान करण्याचा पर्याय सूचवला. त्यासाठी १५ हजार रुपये लागतील, असे सांगितले. तसेच मुलगी झाली तर २० हजार रुपयांत गर्भपाताचीही सोय असल्याचे सांगितले. हा धक्कादायक प्रकार ऐकल्यानंतर तक्रारदार महिलेने प्रसूतीपूर्व गर्भलिंग निदान प्रतिबंधक समितीच्या सदस्य गीता हासूरकर यांच्याकडे धाव घेऊन तक्रार दिली.हासूरकर यांनी तक्रारदार महिलेच्या मदतीने स्टिंग ऑपरेशन करून श्री हॉस्पिटलचा भंडाफोड केला. हॉस्पिटलचे पॉझिटिव्ह, निगेटिव्हचे कोडवर्डही समोर आले. महापालिकेतील आरोग्य अधिकाऱ्यांच्या तपासणीदरम्यान श्री हॉस्पिटलच्या दैनंदिन कामात अनेक त्रुटी आढळल्या. तक्रारदार महिलेचा केसपेपर तयार केला नव्हता. अनेक रुग्णांच्या नोंदी ठेवलेल्या नाहीत. रुग्णांची माहिती देण्यास कर्मचाऱ्यांनी चालढकल केली. रुग्णालयातील सीसीटीव्ही कॅमेरे काही काळ बंद होते. डॉ. वालावलकर आणि हॉस्पिटल स्टाफच्या उत्तरांमध्ये विसंगती आढळल्याचे हासूरकर यांनी सांगितले.मशीन बंद असल्याचा कांगावावर्षभरापासून सोनोग्राफी मशीन बंद असल्यामुळे आमच्याकडे सोनोग्राफी होत नाही. आम्ही कोणाचीही सोनोग्राफी केलेली नाही. रुग्णाच्या समाधानासाठी त्यांची तपासणी केली. असा कांगावा डॉ. वालावलकर यांनी तपासणीदरम्यान केला. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मशीन इंजिनिअरला बोलवून मशीनची तपासणी केली. त्यानंतर मशीन सील करण्यात आले.

अन्य रुग्णांमध्ये भीतीचे वातावरण

स्टिंग ऑपरेशननंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांचे पथक आणि प्रसारमाध्यमांचे कॅमेरे हॉस्पिटलमध्ये पोहोचताच रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक घाबरले. पोलिसांनी रुग्णांची नावे लिहून घेताच काही रुग्णांसह त्यांच्या नातेवाइकांनी काढता पाय घेतला. अधिकाऱ्यांच्या प्रश्नांना उत्तरे देताना कर्मचाऱ्यांना घाम फुटला.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरPregnancyप्रेग्नंसी