रहिमतपूरला महिलांना धक्काबुक्की

By Admin | Updated: November 15, 2014 00:05 IST2014-11-14T23:42:28+5:302014-11-15T00:05:04+5:30

दहशत माजवली : सोळाजणांना पाठलाग करून पकडले

Rahimatpura scare women | रहिमतपूरला महिलांना धक्काबुक्की

रहिमतपूरला महिलांना धक्काबुक्की

रहिमतपूर : कोरेगाव तालुक्यातील रहिमतपूर येथे एका रस्त्याच्या कामावरून दहशत माजवून महिलांना धक्काबुक्की करणाऱ्या सोळाजणांना रहिमतपूर पोलीस आणि स्थानिक ग्रामस्थांनी पाठलाग करून ताब्यात घेतले. याप्रकरणी रहिमतपूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. दरम्यान ताब्यात घेतलेल्यांच्या अटकेची कारवाई रात्री उशिरापर्यंत सुरू होती.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, रहिमतपूर हद्दीत ब्रह्मपुरीरोड नजीक असणाऱ्या चिखल ओढा परिसरात रस्ता खुला करण्याचे काम सुरू आहे. ते काम बंद करावे म्हणून हणमंत शंकर चव्हाण, रवींद्र हणमंत चव्हाण, अभिजित हणमंत चव्हाण, अविनाश हणमंत चव्हाण (सर्व रा. काशीद गल्ली, रहिमतपूर) यांनी स्वप्निल सुनील भोसले, गणेश शिवाजी भोसले (रा. समर्थनगर, सातारा), पंकज प्रल्हाद जाधव (रा. आकुर्डी, पुणे), भरत दिलीप शिंदे, प्रशांत लक्ष्मण कदम, अमोल मच्छिंद्र सूर्यवंशी, तुषार अर्जुन जाधव (रा. भक्तवडी, ता. कोरेगाव), अनिल नवनाथ माने (कोडोली-सातारा), रविकांत हणमंत अहिवळे (रा. संभाजीनगर), तुषार राजेंद्र जाधव (रा. चिंचणेर निंब), संदीप रघुनाथ जाधव, सुनील राजेंद्र शिंदे (मेघदूत कॉलनी, संभाजीनगर, सातारा) यांना बरोबर घेतले.
या सर्वांनी मिळून विजय प्रल्हाद चव्हाण, ताई हणमंत चव्हाण, सावित्री हणमंत चव्हाण त्याचबरोबर भावकीतील अन्य काही लोकांना ‘रस्ता खुला करण्याचे काम बंद करा नाही तर तुमच्याकडे बघतो,’ असे धमकावले. यावेळी तलवारी आणि दांडक्याचा वापर करण्यात आला. (वार्ताहर)


पोलिसांत गुन्हा दाखल
घटनेची माहिती पोलिसांना समजल्यानंतर ते घटनास्थळी पोहोचले. याचवेळी संबंधित दहशत माजविणारे इंडिका कार (एमएच ११ एके ४६२९), महिंद्रा लोगान कार (एमएच १४ बीसी ४२६८), दुचाकी (एमएच ११ एएच २६७१) यामधून पळून जाऊ लागले. मात्र, पोलीस आणि ग्रामस्थांनी पाठलाग करून पकडले. त्यांच्यावर रहिमतपूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला असून, अधिक तपास एस. आर. गलांडे, जगदीश फणसे, प्रशांत पाटील करत आहेत.

Web Title: Rahimatpura scare women

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.