शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

साडेतीन हजाराशिवाय कांडे तोडू देणार नाही - रघुनाथदादा पाटील कोल्हापुरातील ऊस परिषदेत इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2018 20:59 IST

आगामी हंगामात विना कपात प्रतिटन साडेतीन हजार रुपये पहिली उचल आणि साडेचार हजार रुपये अंतिम दर जाहीर केल्याशिवाय उसाच्या एका कांड्यालाही हात लावू देणार नाही, असा इशारा शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांनी दिला

ठळक मुद्दे सरकार व कारखानदारांशी संगनमत करून शेतकऱ्यांच्या अन्नात माती कालवाल तर याद राखा राज्यकर्त्यांनी एफआरपी ८.५ टक्क्यांवरून १० टक्के केल्याने शेतकºयांचे मोठे नुकसान झाले आहे.

कोल्हापूर : आगामी हंगामात विना कपात प्रतिटन साडेतीन हजार रुपये पहिली उचल आणि साडेचार हजार रुपये अंतिम दर जाहीर केल्याशिवाय उसाच्या एका कांड्यालाही हात लावू देणार नाही, असा इशारा शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांनी दिला. सरकार व कारखानदारांशी संगनमत करून शेतकऱ्यांच्या अन्नात माती कालवाल तर याद राखा, असेही त्यांनी संघटना नेत्यांना ठणकावून सांगितले.

शेतकरी संघटनेची ऊस परिषद बुधवारी शाहू स्मारक भवनात झाली, त्यावेळी पाटील यांनी राज्य व केंद्र सरकारसह शेतकरी संघटनांच्या नेत्यांवर आरोपांची तोफ डागली. रघुनाथदादा पाटील म्हणाले, राज्यकर्त्यांनी एफआरपी ८.५ टक्क्यांवरून १० टक्के केल्याने शेतकºयांचे मोठे नुकसान झाले आहे.

यंदा साखरेचे उत्पादन जास्त असल्याचा कांगावा काही मंडळी करत आहेत; पण वस्तुस्थिती वेगळी असून अतिवृष्टीने उसाचे उत्पादन घटणार आहे. गेल्यावर्षी राजू शेट्टी यांनी साखर कारखानदारांबरोबर एफआरपी अधिक दोनशे रुपयांवर तडजोड केली; पण शेतकऱ्यांच्या हातात कशी-बशी एफआरपी पडली, उर्वरित दोनशे रुपये कोण देणारऱ्याचा जाब शेतकºयांनी राजू शेट्टींना विचारला पाहिजे. या हंगामातही ‘एफआरपी’चे तुकडे करण्याची भाषा सरकारधार्जिण शेतकरी संघटना करत आहेत. गुजरात व महाराष्टत साखरेचे भाव सारखेच, कायदे, धोरणे सारखीच असताना दरात फरक कसा? त्यामुळे कोणी काहीही वल्गना केल्या तरी विनाकपात प्रतिटन साडेतीन हजार पहिली उचल घेतल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही.जयसिंगपूरची ‘ऊस परिषद राष्टवादी’प्रणित

‘स्वाभिमानी’च्या निर्मितीमागे शरद पवार, विलासराव देशमुख होते, हे गेले अनेक वर्षे सांगत आलोय. येथून पाठीमागे जयंत पाटील हे शेट्टींना पडद्यामागे राहून मदत करायचे, आता उघड करणार एवढाच फरक आहे. त्यामुळे ‘स्वाभिमानी’ची जयसिंगपूरची ऊस परिषद ही राष्टवादी तर सदाभाऊ खोत यांची वारणानगरची परिषद भाजपप्रणित असल्याचा आरोप पाटील यांनी केला.

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरSugar factoryसाखर कारखाने