ठिकपुर्ली येथे राधानगरी पोलिसांचा जुगार अड्ड्यावर छापा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2021 04:16 IST2021-06-27T04:16:11+5:302021-06-27T04:16:11+5:30

ठिकपुर्ली (ता. राधानगरी) येथे राधानगरी पोलिसांनी अवैधरीत्या सुरू असणाऱ्या तीन पानी जुगार अड्ड्यावर छापा टाकून दुचाकीसह सतरा हजार दोनशे ...

Radhanagari police raids gambling den at Thikpurli | ठिकपुर्ली येथे राधानगरी पोलिसांचा जुगार अड्ड्यावर छापा

ठिकपुर्ली येथे राधानगरी पोलिसांचा जुगार अड्ड्यावर छापा

ठिकपुर्ली (ता. राधानगरी) येथे राधानगरी पोलिसांनी अवैधरीत्या सुरू असणाऱ्या तीन पानी जुगार अड्ड्यावर छापा टाकून दुचाकीसह सतरा हजार दोनशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाई वेळी दोन आरोपी पळून गेले तर दोन आरोपींना पकडण्यात राधानगरी पोलिसांना यश आले. आरोपीवर राधानगरी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राधानगरी पोलिसांनी जुगार अड्ड्यावर छापा टाकल्यानंतर दत्तात्रय देवकर आणि पप्पू शेटे हे घटनास्थळावरून पळून गेले तर दादासोा गोसावी शेळेवाडी आणि मिलिंद भंडारी ठिकपुर्ली या दोघांना पोलिसांनी शिताफीने पकडले. या कारवाईत पोलीस कॉन्स्टेबल खंडू लोकरे, सुरेश मेटील, सचिन पारखे, कृष्णात खामकर यांनी सहभाग घेतला होता.

Web Title: Radhanagari police raids gambling den at Thikpurli